Shahid Kapoor ची पत्नी मीरा राजपूतच्या ताज्या फोटोमध्ये दिसला तिचा बेबी बंप, काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत भलेही कोणी बॉलिवूड अभिनेत्री किंवा मोठी सेलिब्रिटी नसली तरीही लोक तिला एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणेच पसंत करतात. म्हणूनच मीराचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मीरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा तिचे आणि फॅमिलीचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच मीराने स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामुळे लोक थोडे गोंधळले आहेत आणि विचार करत आहेत की ‘मीरा पुन्हा प्रेगनंट आहे का?’

वास्तविक मीराने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या ताज्या फोटोत तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो मीराच्या घरातील असल्याचे दिसत आहे. तिने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा एक साधा सूट घातला आहे आणि ती स्वत: देखील खूप साधी दिसत आहे. फोटोत मीराचे डोळे मिटलेले आहेत, पण ती कॅमेर्‍याकडे तोंड करून किस करत आहे. आता हा फोटो बघून नक्कीच तुम्हालाही हाच प्रश्न पडेल की, मीरा पुन्हा प्रेगनंट आहे का? परंतु तसे नाही. ती प्रेगनंट नाही. तिचा हा जुना फोटो आहे, जेव्हा ती पहिल्यांदा गर्भवती होती आणि मीशाचा जन्म झाला होता. मीराने स्वत: याबद्दल सांगितले आहे.

हा फोटो शेअर करत मीराने त्यामागची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. मीराने लिहिले की, ‘प्रसूतीच्या एक दिवस अगोदर #4yearsagotoday. मला हे समजू शकते की पोट वाढत होते पण नाकाचे काय झाले होते, ते का वाढत होते? मीराच्या या फोटोवर चाहत्यांचा आधी गोंधळ उडाला, पण कॅप्शन वाचल्यानंतर सर्वांना समजले की हा जुना फोटो आहे, तिच्या प्रसूतीच्या एक दिवस आधीचा फोटो आहे. शाहिद आणि मीराला मोठी मुलगी मीशा आणि मुलगा झेन अशी दोन मुले आहेत.