Shahrukh Khan New Look : खूपच दिवसांनी दिसला शाहरूख खान, बदललेल्या हेअरस्टाइलमुळं वेगळाच लूक

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) बऱ्याच दिवसांपासून कोरोनामुळे घरात आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांना तो समोर दिसत नाही. परंतु शाहरुख खान (Shahrukh Khan)ने बर्‍याच दिवसांनंतर आपली झलक दाखवली आहे. व विशेष म्हणजे या वेळी शाहरुख बर्‍यापैकी बदललेला दिसत आहे.
शाहरुख खान हा दुबईत सुरू असलेल्या आयपीएलदरम्यान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पाहण्यासाठी आला होता. मात्र, शाहरुख खान टीव्हीवर दिसताच चाहत्यांनी त्याच्या लूकबद्दल चर्चा सुरू केली आहे.

सामन्यासोबतच त्याच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तसे, शाहरुख खान नेहमीच एका लूकमध्ये दिसतो. शाहरुख खानने आपली हेअरस्टाईल पूर्णपणे बदलली आहे. ज्यात शाहरुख चे केस वाढलेले आहेत व मास्क व कॅप मुले वेगळा दिसत आहे. त्याने दाढी देखील वाढवली आहे या लुक मध्ये तो प्रेक्षकांना पहिल्यांदाच दिसत आहे.

व हे फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शाहरुख खानसोबत मुलगा आर्यन आणि पत्नी गौरी खान देखील होते. सामन्यादरम्यान शाहरुख खानला बर्‍याच वेळा दाखविण्यात आले. आणि त्यांची अनेक छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली जात आहेत. यात शाहरुख आपल्या मुलासह दिसला आहे. शाहरुखच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचा हा लूक पाहून खूप आनंद झाला.