गौरी खाननं ‘गुपित’ सांगितलं, पुरावा म्हणून दाखवला शाहरूख आणि काजोलचा ‘तो’ फोटो

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन- बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याची पत्नी गौरी खान सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या एका खुलाश्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. तिने ट्विटरवर एका मॅसेज बरोबर फोटो देखील ट्विट केला आहे. यामध्ये बाजीगर सिनेमातील शाहरुख खान आणि काजोल दिसून येत आहेत. हा फोटो सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असून यामुळे अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

गौरी खान अभिनेत्री नसली तरी देखील ती सुपरस्टार पेक्षा कमी नाही. तिने तिच्या बळावर ते स्थान मिळवले असून ती एक उद्योजिका आहे. तिची कंपनी इंटिरियर बनवण्याचे काम करते. त्यानंतर आता तिने नवीन खुलासा केला असून तिने सांगितले कि, बाजीगर चित्रपटातील शाहरुख खान याचे कपडे तिनेच डिझाईन केले होते. 1993 मध्ये आलेल्या या चित्रपटाविषयी गौरी खान हिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, या चित्रपटातील संपूर्ण लूक मीच डिझाईन केला होता.

ती जीन्स, लेग वॉर्मर टी, बुलेट बेल्ट आणि तो लाल शर्ट. त्यातील हाताने बनवलेली जीन्स माझी सर्वात आवडती होती. दरम्यान, 90 च्या दशकात आलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यावेळी सर्वात ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट होता. त्यावेळी त्याची स्टाईल इतकी लोकप्रिय झाली होती कि, लोकं त्याला फॉलो करत असतं. त्यामुळे आजही तो चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –