अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबत पिता शक्ती कपूर म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक मीडिया रिपोर्ट्सने नुकताच असा दावा केला होता की, शक्ती कपूरची लाडकी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच लग्न करणार आहे. एवढेच काय तर तिच्या लग्नाचा टाईमदेखील सांगितला जात होता. या रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात होतं की, श्रद्धा आपल्या लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. या सर्व वृत्तांवर श्रद्धा कपूरने तर अद्याप कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु तिचे वडिल अभिनेता शक्ती कपूर यांनी यावर खुलून भाष्य केलं आहे. खूपच मजेशीर पद्धतीने त्यांनी यावर कमेंट केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी श्रद्धाच्या लग्नाच्या वृत्तांबाबत बोलताना शक्ती कपूर म्हणाले की, “अच्छा माझी मुलगी लग्न करत आहे? मला लग्नाला बोलवायला विसरू नका. मलाही सांगा की लग्न कोठे होत आहे. मी पोहोचेल तिथे. मी तिचा बाप असून मला तिच्या लग्नाविषयी माहीत नाही.” शक्ती कपूर यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होतं की, ते श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या माहितीला मीडियासमोर आणू इच्छित नाही किंवा मग या सगळ्या लग्नाच्या चर्चा केवळ अफवा आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार दावा करण्यात येत होता की, श्रद्धा कपूर आपला कथित बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठा सोबत 2020 मध्ये लग्न करणार आहे. दोन्ही कुटुंबात लग्नाची बोलणी सुरु झाली आहे असेही सांगितले जात होते. दोघांच्या अफेअरला घेऊन याआधीही खूप अफवा उडाल्या आहेत. श्रद्धा कपूर आपल्या रिलेशनशिपबाबत कधीच खुलून बोलताना दिसली नाही. अनेकदा या दोघांना एकत्र टाईम स्पेंड करताना स्पॉट करण्यात आलं आहे.

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील एक टॉप अॅक्ट्रेस आहे. तर रोहन श्रेष्ठा प्रसिद्ध फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा आणि प्रसिद्ध फुटबॉलर आहे. मीडिया रिपोर्ट्समध्येही असेही सांगितले जात होते की, श्रद्धा कपूर आणि रोहन एकमेकांना तब्बल 2 वर्षांपासून डेट करत आहेत. सोशल मीडियावर श्रद्धा आणि रोहनचे अनेक फोटो याआधीही समोर आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

तुमच्याही स्वयंपाकघरात आहे, हे अनेक आजारांवरील रामबाण औषध

‘हे’ आहेत प्रोस्टेट कॅन्सर बाबतचे ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या

डोळयातून पाणी येतंय मग ‘या’ ४ गोष्टींचा काळजी घ्या

बहुजननामा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या कामाची पॅलेस्टाईनने घेतली दखल, पॅलेस्टाईन सरकारकडून सन्मान

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आघाडी काळात रखडलेल्या मराठा मुलांना न्याय, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

सिनेजगत

Photo : ४२ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने केलं गुपचूप लग्न !

Photos : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नेंट अॅमी जॅक्शनची इटलीतील वॅकेशनदरम्यान ‘धमाल’ !

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणुकीचा FIR

You might also like