शशी कपूर यांच्या कन्या संजना यांनी फ्रान्समध्ये रोशन केलं भारताचं नाव, मिळवला ‘हा’ मोठा सन्मान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रंगकर्मी संजना कपूर यांना थिएटर क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल मंगळवारी फ्रन्सीसी अवॉर्ड(नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स) मिळाला आहे. कपूर मुंबईतील जुनून ही कंपनी चालवतात. फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री फ्रँक रीस्तर यांनी त्यांचा सन्मान केला आहे. जे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

सांस्कृतिक मंत्री फ्रँक रिस्तर म्हणाले, “तुमचा उत्कृष्ट कलात्मक प्रवास पाहून आनंद वाटत आहे. थिएटर प्रति एवढी रुची ठेवणारी महिला या नात्यानं तुम्ही अधिकाधिक लोकापर्यंत तुम्ही कला पोचवण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे समर्पित केलं.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “तुम्ही स्टेजवर असो वा कॅमेऱ्याच्या मागे किंवा तुमच्या संस्थेमध्ये काम करत असाल तरीही तुम्ही कलेला समाजात सर्वोच्च स्थान देण्यासाठी तेवढ्याच समर्पण आणि उत्साहानं काम केलं.”

फिल्म ॲक्टर शशी कपूर आणि ब्रिटीश अभिनेत्री जेनिफर केंडल यांची मुलगी संजना कपूर(52) यांनी अपर्णा सेन यांच्या 36 चौरंगी लेन (1981) या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

त्यांनी 1989 मध्ये आलेल्या हिरो हिरालाल या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. मीरा नायर यांच्या सलाम बांबे (1988) मध्येही त्या दिसल्या होत्या. परंतु त्यांनी नंतर थिएटरसाठी स्वत:ला समर्पित केलं. त्यांनी अनेक नाटकात काम केलं आहे. मुंबईच्या पृथ्वी थिएटरला पुन्हा जिवंत करण्यासाठीही त्यांनी योगदान दिलं आहे. या थिएटरची स्थापना त्यांच्या आई-वडिलांनी केली होती. सध्या ते रंगमंच प्रसार आणि नव्या माध्यामातून कला व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like