सोनम कपूरला ‘बर्थडे विश’ करताना शत्रुघ्न सिन्हा यांनी केली मोठी चूक, ट्रोल झाल्यानंतर डिलीट केलं Tweet !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सोनम कपूर हिनं कालच (मंगळवार दि 9 जून 2020) आपला 35 वा वाढदिवस साजरा केला. या खास मोक्यावर ती मुंबईत आपल्या कुटुंबासोबत आहे. पती आनंद आहुजा देखील तिच्यासोबत होता. सोनमनं आनंदसाठी सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली होती. खास बात अशी साऱ्यांनीच तिला शुभेच्छा दिल्या. परंतु जास्त चर्चा कोणाची झाली असेल तर ती म्हणजे बॉलिवूड अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या शुभेच्छांची. शॉटगन यांची सोनमच्या बर्थडे विशची पोस्ट सोशलवर व्हायरल होत असून चाहते त्यांना जोरदार ट्रोल करत आहेत.

शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्विटरवरून एक फोटो शेअर केला होता. खास बात अशी की, शत्रुघ्न यांनी जो फोटो शेअर केला त्यात सोनमचे वडिल अभिनेता अनिल कपूर आणि त्याचं कुटंब दिसत होतं. परंतु खुद्द सोनमच यात मिसिंग होती. फोटोत ती कुठेच नव्हती. जिचा वाढदिवस आहे तीच फोटोत नाही तरीही तिला विश केल्यानं युजर्नसं शत्रुघ्न यांना खूप ट्रोल केलं आणि खिल्ली उडवली.

खूप जास्त ट्रोल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शॉटगननं ते ट्विट डिलीट केलं. परंतु तरीही अनेक युजर्स त्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत शॉटगनची खिल्ली उडवत आहेत.