Bigg Boss 13 फेम शहनाज गिलच्या वडिलांवर महिलेनं केला लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप ! जाणून घ्या पूर्ण प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बिग बॉस 13 ची बेस्ट एंटरटेनर आणि फेमस पंजाबी सिंगर शहनाज कौर गिलचं कुटुंब अडचणीत सापडलं आहे. तिचे वडिल संतोख सिंह यांच्या विरोधात जालंधरमध्ये एक महिलेनं लैंगिक शोषणाचे आरोप करत केस दाखल केली आहे. महिलेचा आरोप आरोप आहे की जेव्हा ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी संतोख सिंहच्या घरी गेली तेव्हा त्यांनी तिचं लैंगिक शोषण केलं. इतकंच नाही तर तिला तोंड बंद ठेवण्याची धमकीही दिली. हे प्रकरण 14 मेचं असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु केस मात्र 15 मे रोजी दाखल करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

रिपोर्टनुसार आरोप करणाऱ्या महिलेची आणि लकी संधू उर्फ रणधीर संधू नावाच्या मुलाची 12 वर्षांची दोस्ती आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात काही बिनसल्यानं तो निघून गेला. महिलेला असं समजलं की, तो शहनाजचे वडिल संतोख सिंह यांच्या घरी थांबला आहे. 14 मे रोजी महिला तिची आल्टो कार घेऊन सायंकाळी 5.30 मिनिटांनी संतोख सिंहच्या घरी गेली. संतोख यांनी रणधीरला भेटवण्याच्या बहाण्यानं तिला कारमध्ये बसवलं आणि रूही ब्रिजकडे घेऊन गेले. बंदूकीचा धाक दाखवत तिचं लैंगिक शोषण करून त्यांनी तिला तिच्या मैत्रिणीकडे सोडलं.

महिलेनं पोलिसांना असंही सांगितलं की, संखोख यांनी दिली धमकी दिली होती की, जर तिनं कोणाला काही सांगितलं तर ते तिला ठार मारतील. महिलेनं 15 मे रोजी संतोख सिंह यांच्याविरोधात केस दाखल केली.