क्रूजवर मस्ती करताना शिल्पा शेट्टीचा ड्रेस उडाला हवेत, आणि झाले ‘असे’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – बॉलिवूड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी सध्या आपल्या फॅमिलीसोबत युरोपमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. सुट्ट्यांचा आनंद घेताना शिल्पाने अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले आहेत. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने नुकताच तिचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यात शिल्पा उप्स (oops) मूमेंटची शिकार झाल्याचे दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, शिल्पा क्रूजवर उभी आहे आणि फोटो काढण्यासाठी पोज देत आहे. तेव्हाच जोरात वाहणाऱ्या वाऱ्याने तिचा ड्रेस हवेत उडताना दिसत आहे.

फोटो काढताना उप्स मूमेंटची शिकार झाल्यानंतर शिल्पाने लगेचच आपला ड्रेस सांभाळला. यानंतर ती स्वत:च स्वत:वर हसताना दिसते. आणखी गोष्ट अशी उप्स मूमेंटची शिकार झाल्यानंतरही ती व्हिडीओ थांबवत नाही तर या मुमेंटचा आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडीओला शिल्पाने मजेदार कॅप्शन दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये ती म्हणते की, “My ‘Marilyn Monroe’ moment on the cruise wasn’t exactly a ‘breeze’ Please watch till the end.. #throwback #bloopers #funtimes #vacation #cruising #slomo #laughs #epic”

शिल्पा शेट्टी स्वत:च हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहण्यास सांगत आहे. शिल्पासोबत तिचा पती राज कुंद्रा आणि मुलगा वियानदेखील आहे. याधीही शिल्पाने इंस्टाग्रामवर सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –