मुलगी ‘समीशा’ला घेऊन पहिल्यांदाच मीडियासमोर आली शिल्पा शेट्टी (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा पॅरेंट्स बनले. सरोगेसीनं शिल्पाच्या घरी नन्ही परी आली. 15 फेब्रुवारी 2020 रोजी समीशाचा जन्म झाला आणि 21 फेब्रुवारी रोजी शिल्पानं सोशल मीडियावरून ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. यानंतर काहींनी तिला शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिला सरोगेसीसाठी ट्रोलही केलं. यानंतर आता शिल्पा तिचे पती राज कुंद्रा आणि तिची दोन्ही मुलं एकत्र दिसली आहेत.

शिल्पा शेट्टी नुकतीच पूर्ण फॅमिलीसोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी तिची मुलगी समीशाही दिसली. तिनं समीशाचा चेहार कवर केला होता. शिल्पाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून हे स्पष्ट दिसत होतं की, शिल्पा शेट्टीसहित तिच्या कुटुंबातील सारेच लोक या नवीन पाहुण्याच्या येण्यानं खूपच खुश आहेत. सध्या शिल्पा शेट्टीचे हे फॅमिलीसोबतचे एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. शिल्पाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शिल्पानं एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं होतं की, गेल्या 5 वर्षांपासून ती दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करत आहे. परंतु तिला यश न मिळाल्यानं दोघांनी सरोगेसीनं मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं निकम्मा आणि हंगामा 2 हे सिनेमे साईन केले आहेत. यानंतर तिला समजलं होतं की, ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.