शिल्पा शिरोडकर बनली ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेणारी पहिली अ‍ॅक्ट्रेस, शेयर केला अनुभव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आता जगभरात व्हॅक्सीनेशन सुरू झाले आहे. भारतात सध्या यासाठी हालचाली सुरू आहेत. हम, गोपी किशन, आंखे, बेवफा सनम, खुदा गवाह सारख्या हिट चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दर्शवणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे जिने नुकतीच कोरोना व्हॅक्सीन घेतली आहे. शिल्पा मोठ्या कालावधीपासून पडद्यापासून दूर आहे, मात्र सोशल मीडियावर ती खुप अ‍ॅक्टिव्ह असते. व्हॅक्सीनेशन नंतर तिने आपला अनुभव शेयर केला आहे.

शिल्पा शिरोडकरने आपल्या छायाचित्रांसह आपला अनूभव सांगितला. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने शेयर केलेल्या छायाचित्रात शिल्पाने चेहर्‍याला मास्क लावलेला दिसत आहे, सोबतच तिच्या दंडावर हलकी पट्टी लावलेली दिसत आहे. हे छायाचित्र शेयर करत तिने लिहिले आहे की, – ’व्हॅक्सीनेटेड आणि सुरक्षित….हे न्यू नॉर्मल आहे….2021 मध्ये येत आहे’.

शिल्पाची ही छायाचित्रे सोशल मीडियावर जबरदस्त वायरल होत आहेत. शिल्पाशिवाय आतापर्यंत कोणत्याही भारतीय अभिनेत्रीने कोरोना व्हॅक्सीन घेतलेली नाही. शिल्पाने दुबईत व्हॅक्सीन घेतली आहे. ती लग्नानंतर काही दिवस इंडियामध्ये राहिली होती. त्यानंतर दुबईला गेली. शिल्पाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, 2000 मध्ये तिचा विवाह झाला होता. यानंतर ते आणि मी पाच वर्षापर्यंत लाँग डिस्टन्समध्ये राहिलो. यानंतर ती दुबईला गेली. तिथे कुटुंबासोबत राहते.

शिल्पा शिरोडकर लवकरच पडद्यावर पुनरागमन करणार आहे. याबाबत तिने म्हटले आहे की, माझ्या काळापासून आतापर्यंत सिनेमात खुपकाही बदलले आहे. आता लोक जास्त प्रोफेशनल झाले आहेत. तिने म्हटले की, मी करियरच्या ज्या स्टेजमध्ये आहे, तिथे रोमँटिक लीड कॅरेक्टर प्ले करण्याबाबत विचार करू शकत नाही.