Punjab : शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबली जान्हवी कपूरच्या ‘गुड लक जेरी’ सिनेमाची शुटींग !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अनेक दिवसांपासून तिच्या गुड लक जेरी या आगामी सिनेमामुळं चर्चेत येताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या एका समूहाकडून पंजाबच्या पटीयाला मध्ये आंदोलन केल्यानंतर जान्हवीचा आगामी सिनेमा गुड लक जेरी ची शुटींग रोखण्यात आली. सिव्हील लाईन्स भागाजवळ शनिवारी ही घटना समोर आली, जेव्हा आंदोलनकर्त्यांनी सिनेमाच्या शुटींगला विरोध केला.

बॉलिवूडविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचं फिल्म इंडस्ट्रीतील कोणत्याही अ‍ॅक्टरनं समर्थन केलं नाही. राजवंत सिंह संधू म्हणाले, पंजाबमध्ये शुटींग करणाऱ्या फिल्म उद्योगातल्या लोकांना आम्ही सांगत आहोत की, किमान त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या समर्थनात बोलावं जे कायद्यांविरोधात आंदोनल करत आहेत.

आणखी आंदोलनकर्ता म्हणाला, आम्ही बॉलिवूड कलाकारांचा विरोध यासाठी करत आहोत, कारण ते शेतकऱ्यांचं समर्थन करत नहाीत. काही शेतकरी त्या हॉटेलच्या बाहेर आंदोलन करत आहेत जिथं सिनेमाची टीम थांबली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं रविवारी सांगितलं की, आंदोलन शांतीपूर्ण होतं.

याआधीही 11 जानेवारी 2021 रोजी नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अ‍ॅक्ट्रेस जान्हवी कपूरवर निशाणा साधला होता. सिनेमाच्या शुटींगच्या सेटवर आलेल्या शेतकऱ्यांनी जान्हवीला प्रतिक्रिया देण्यासाठी सांगितलं होतं. परंतु अ‍ॅक्ट्रेसनं यावर काही उत्तर दिलं नाही. गर्दी करत सेटवर आलेले शेतकरी डायरेक्टरनं विश्वास दिल्यानंतरच तिथून हटले.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्ये दिसली होती. अलीकडेच जान्हवीनं गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलला गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही काम केलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती रूही अफजाना या सिनेमात राजकुमार रावसोबत काम करताना दिसणार आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे करण जोहरचा मल्टीस्टारर तख्त हा सिनेमादेखील आहे. आता ती गुड लक जेरी या सिनेमावर काम करत आहे.