कडाक्याच्या थंडीत अभिनेत्री श्रद्धा कपूरनं शेअर केला ‘HOT’ लुक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या आपला आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सर 3 डीमुळे चर्चेत आहे. सध्या ती प्रमोशनध्ये व्यस्त आहे. अशात तिची वेगळी स्टाईल पहायला मिळत आहे. श्रद्दानं नुकतेच इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत श्रद्धा खूपच बोल्ड आणि स्टायलिश दिसत आहे.

श्रद्धानं प्रमोशनदरम्यान स्ट्रैपलेस ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये तिचा लुक कमालीचा सुंदर दिसत आहे. श्रद्धानं शॉर्ट ड्रेसला बोल्डनेसचा तडका दिला आहे. श्रद्धा खूपच सुंदर आणि तितकीच स्टनिंग दिसत आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा भरतीय सिनेमातील सर्वात मोठा 3 डी डान्स सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. 24 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 17 डिसेंबर रोजी या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे.

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सर 3 डी व्यतिरीक्त श्रद्धा डायरेक्टर अहमद खानचा सिनेमा बागी 3 मध्येही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 6 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/