Video : शांतनु हजारिकाला डेट करतेय श्रुती हासन ? खास अंदाजात त्याच्यासोबत साजरा केला Birthday !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) हिनं अनेक बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. सध्या ती साऊथच्या इंडस्ट्रीत जास्त सक्रिय असल्याचं दिसत आहे. श्रुती सोशल मीडियावर सुपरॲक्टीव असते. श्रुतीनं अनेकदा आपल्या हॉट अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत ज्यामुळे ती अनेकदा सोशलवर चर्चेचा हिस्सा बनताना दिसली आहे. श्रुतीनं बिकिनीतील फोटोही शेअर केले आहेत. श्रुतीनं 28 जानेवारी 2020 रोजी तिचा वाढदिवस साजरा केला आहे. याचे काही फोटो समोर आल्यानंतर तिच्या रिलेशनशिपबद्दल बोललं जात आहे. सध्या डेटींगच्या बातम्यांमुळं चर्चेत आली आहे.

श्रुतीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती शांतनु हजारिका सोबत दिसत आहे. तिचे फोटो आणि त्यांच्यातील क्लोजनेस पाहून असं वाटत आहे की, दोघं नात्यात आहेत. त्यांचे हे फोटो समोर आल्यानंतर आता त्यांच्या डेटींगबद्दल बोललं जात आहे. त्यांचा एक सोबतचा व्हिडीओ समोर आला आहे.

श्रतीचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात मुंबईमधील रस्त्यावर ती शांतनुसोबत गळ्यात गळा घालून फिरताना दिसत आहे. शांतनुनंही सोशलवरून खास पोस्ट शेअर तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिला प्रिन्सेस म्हणत हार्ट इमोजीही वापरले आहेत. त्यामुळं चर्चेला उधाण आलं आहे असं दिसतंय.

इतकंच नाहीतर श्रुतीनं काही सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. त्यातही तिच्या सोबत शांतनु दिसत आहे.

श्रुती आणि शांतनुचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी या जोडीचं खूप कौतुक केलं आहे.

शांतनुबद्दल बोलायचं झालं तर तो एक डूडल कलाकार आहे. गॅप- गौहाटी आर्ट प्रोजेक्टचा तो सहसंस्थापक आहे. एक इलस्ट्रेटर म्हणून करिअर करण्यासाठी शांतनुनं त्याची इंजिनियरींग सोडली.

श्रुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती लबाम या तमिळ सिनेमात विजय सेतुपती सोबत काम करताना दिसणार आहे. इतंकच नाही तर प्रभासच्या सलार (SALAAR) या सिनेमातही ती दिसणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच ती साऊथ सुपरस्टार धनुष सोबत थ्री या सिनेमात झळकली होती. श्रुती बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येही सक्रिय आहे. तिनं अनेक फेमस साऊथ इंडियन सिनेमात काम केलं आहे. वानरम आयिरम, पृथ्वी, येननामो येधो असे अनेक सिनेमे केले आहेत. लक सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. परंतु हा सिनेमा खास काही चालला नाही. दिल तो बच्चा है जी, रमैया वस्तावैया, वेलकम बॅक, गब्बर अशा अनेक सिनेमात तिनं काम केलं आहे.