Sikandar Kher Needs Work : अनुपम खेरचा मुलगा सिकंदरनं सोशल मीडियावर मागितलं काम ! पोस्ट शेअर करत म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अनुपम खेर (Anupam Kher) यांचा मुलगा अभिनेता सिकंदर खेर (Sikandar Kher) अलीकडेच डिज्नी प्लस हॉटस्टारवरील (Disney+ Hotstar) वेबसीरिज आर्या (Aarya) मध्ये दिसला होता. यात सिकंदरचा लिड रोल नसला तरी त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली होती. यानंतर सिकंदर आणखी एका वेबसीरिज आणि सिनेमात दिसणार आहे. तरीही त्याचं म्हणणं आहे की, त्याच्याकडे काम नाही आणि त्याला आता काम हवं आहे. त्यानं त्याच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर करत त्याला काम हवं असल्याचं सांगितलं आहे.

सिकंदरनं इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तो खूपच परेशान दिसत आहे. त्याच्या कपाळावर घाम आहे आणि स्माईलही करत नाही. फोटो शेअर करत त्यानं लिहिलं की, मला कमा हवंय, हंसू पण शकतो.

सिकंदरची ही पोस्ट समोर आल्यानंतर अनेकांनी यावर फनी कमेंट केल्या आहेत आणि त्याच्या कामाचं कौतुकही केलं आहे. एकानं कमेंट करत लिहिलं की, सर मला जेवढं माहिती आहे त्यानुसार अमिताभ बच्चन यांच्यानंतर तुम्ही सर्वांत बिजी अ‍ॅक्टर आहात. यावर सिकंदरनं रिप्लाय करत लिहिलं की, तुम्हाला असं वाटतं का की, मी चुल्लू भर पाण्यात बुडून मरावं.

सिकंदरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकताच तो डिज्नी प्लस हॉटस्टारवरील वेबसीरिज आर्यामध्ये दिसला आहे. याशिवाय झी 5 वरील वेबसीरिज मुम भाईमध्येही त्यानं काम केलं आहे. लवकरच तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

You might also like