बेबी डॉल’ फेम सिंगर कनिका कपूरला कोरोनाची लागण ! लंडनहून लखनऊला आल्यानंतर केली 100 लोकांसोबत पार्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चिट्टियां कलाईयां सारखी अनेक गाणी गाणारी सिंगर कनिक कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव आल्याची माहिती समजत आहे. असं म्हटलं जात आहे की, 15 मार्च 2020 रोजी कनिका लंडनहून लखनऊला आली होती. जेव्हा ती लंडनहून आली होती ती कोरोना पॉझिटीव होती. एअरपोर्टवर तिनं तपासणी अधिकाऱ्यांकडून ही माहिती लपवली आणि वॉशरूमचं कारण सांगून बाहेर पडली.

https://www.instagram.com/p/B98tXqnFqE2/

या बातमीनं गोंधळ उडाला होता जेव्हा असं समजलं की, तिनं 100 हून अधिक लोकांना पार्टी दिली होती. त्या अरपार्टमेंटमध्येही गोंधळ उडाला आहे. लखनऊमध्ये तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.

कनिका लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात गेली होती. या कार्यक्रमात अनेक मोठे ऑफिसर आणि अनेक नेतेही होते. पार्टीत सहभागी झालेले सारेच आता दहशतीत आहेत. मूळची ती लखनऊची आहे परंतु आता लंडनची रहिवाशी आहे. तिनं राज चंदोकसोबत लग्न केलं. काही काळानंतर दोघं वेगळे झाले होते. तिला तीन मुलंही आहेत.

इंस्टावरून दिली माहिती

कनिका कपूरनं इंस्टावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आणि सांगितलं की, मला गेल्या 4 दिवसांपासून फ्लू आहे. माझी Covid 19 पॉझिटीव आली आहे. माझ्या कुटुंबालाही सर्वेक्षणात ठेवण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर FIR ची मागणी

कनिका कपूरनं एअरपोर्टवर होणारी तपासणी वॉशरूमच्या नावाखाली टाळणं आणि जाणून बुजून शेकडो लोकांच्या जीवासोबत खेळण्याला घेऊन सोशल मीडियावर युजर नाराज झाले आहेत. अनेक युजर्स FIR दाखल करण्याची आणि तिला दंड करण्याची मागणी करत आहेत. फिल्म मेकर अशोक पंडितनं
ट्विट केलं की, “तुझी लाज वाटत आहे कनिका कपूर. तू कशी काय एवढी बेजबाबदार होऊ शकतेस.”