‘या’ सुप्रसिध्द गायिकेनं 3 वर्षांपूर्वीच केलंय लग्न, खुलासा झाल्यानंतर मित्र ‘कोमात’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडमधील फेमस सिंगर मोनाली ठाकूर हिनं अनेक हिट गाण्यांसाठी तिचा आवाज दिला आहे. मोनालीनं आता असा खुलासा केलाय की, तिचं लग्न झालं आहे आणि याला आता 3 वर्षे झाली आहेत. याबद्दल कोणालाच खबर नाही. तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून समजलं आहे की, तिनं माईक रिक्टर सोबत लग्न केलं आहे. माईक एक रोस्ट्रॉटर असून ऑस्ट्रेलियाचा रहिवासी आहे.

https://www.instagram.com/p/BqZS1EKnuAE/?utm_source=ig_embed

काही दिवसांपूर्वीच मोनालीचं लेटेस्ट सिंगल दिल का फितूर रिलीज झालं. यात माईक देखील आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मोनालीनं 2017 साली लग्न झाल्याचा खुलासा केला आहे. मोनाली म्हणाली, “आमच्या लग्नाच्या बातमीनं अनेकांना झटका बसू शकतो. कारण माझ्या कोणत्याच फ्रेंडला याबद्दल माहिती नाही. आम्ही याची घोषणा करण्यात उशीर करत राहिलो आणि 3 वर्षे उलटून गेली.”

मोनाली पुढे म्हणाली, “मला माहित आहे की, मला लोकांच्या खूप शिव्या पडणार आहेत. जेव्हा विवाह समारंभ ठेवू तेव्हा तेव्हा लोकांना यासाठी आमंत्रित नक्की करू. तेव्हा ते खुश होतील. तसं तर अद्याप काही फायनल झालेलं नाही. सर्व काही सामान्यच होण्याची आम्ही वाट पहात आहोत. मोह मोह के धागे आणि सवार हू ही गाणी देखील मोनालीनं गायली आहेत. काही दिवसांपूर्वीच मोनालीचं लेटेस्ट सिंगल दिल का फितूर रिलीज झालं आहे.