बर्थडे स्पेशल : ‘या’ प्रसिद्ध गायिकेने सोशल मिडियावर ‘न्यूड’ होण्याची दिली होती ‘धमकी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोना माहापात्रा हे म्यूजिक इंडस्ट्रीतील खूप मोठे नाव आहे. ती फक्त तिच्या गाण्याने नाही तर बोल्ड फोटोसाठी देखील सोशल मिडियावर चर्चेत असते. उडिया भजनवाला वाद कोणी विसरु शकत नाही. ज्यावेळी सोनाने सोशल मिडियावर न्यूड होईल अशी धमकी दिली होती. या वादाची सुरुवात एका व्हिडिओमुळे झाली होती. या व्हिडिओमध्ये सोना १७ व्या शताब्दीमध्ये संत आणि भक्त सालबेग यांनी लिहलेले भजन गाताना दिसून आली होती. ‘आहे नीला शैला’ या भजनाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. सोनावर आरोप होता की, व्हिडिओमध्ये तिने काही शब्द चुकीचे उच्चारले होते.

https://www.instagram.com/p/BxQIH_NAaAe/

यावर ट्विट करुन सोना म्हणाली की, जे लोक अजूनपर्यंत माझ्या विदेशी उच्चारावर जळत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता. काही लोक सोनाच्या शब्दांच्या उच्चारांवर नाराज झाले होते. त्यामध्ये काही असे लोक होते. ज्यांना त्या व्हिडिओमधील सोनाचा ड्रेस आवडला नव्हता. बिभू नावाच्या एका युजरने लिहले की, मॅडम ‘लालपरी’ हे एक भजन आहे. कोणते मॉर्डन गाणे नाही जेणेकरुन तुम्ही यामध्ये हाफ नेकेड गाउन आणि हाय हिल्स सैंडल घातला आहे. तुम्ही उडिसाच्या आहात. भजन आपली संस्कृती आहे. तुम्हाला याचे नुकसान करण्याचा अधिकार कोणी दिला ? चोर आणि वर शिरजोर

https://www.instagram.com/p/BwEp57dH_VT/

युजर्सच्या कमेंट पाहून सोनाचा पारा खूप वाढला होता. तिने अशी कमेंट केली की ती चर्चेमध्येच आली. सोनाने लिहले की, ‘तु आणि तुमच्यासारखे अशिक्षित लोकांनी गप्प बसा. खूप दिवस झाले तुमचे फालतु बोलणे मी ऐकत आहे. जर तुम्ही गप्प राहिले नाही तर पुर्ण न्यूड होऊन चंडीचे रंग दाखवेन. चंडी ही एक हिंदू देवी आहे. जी आपल्या राग आणि विचित्र रुपाने ओळखली जाते. ‘

Loading...
You might also like