‘दबंग’च्या बदल्यात सलमानने केली ‘ही’ मागणी, याचं वाईट वाटतं’, सोनाक्षीचा मोठा ‘गौप्सस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा आगामी सिनेमा खानदानी शफाखान या आठवड्यात रिलीज होणार आहे. या सिनेमात सोनाक्षी प्रमुख भूमिकेत आहे. नुकतीच तिने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने आपला पहिला सिनेमा दबंगमध्ये डेब्यू करतानाच्या काही गोष्टी सांगितल्या. यावेळी तिने सलमानबाबत मोठा खुलासा केला.

खूप जाड होती सोनाक्षी सिन्हा

सोनाक्षीने सांगितले की, सिनेमात येण्याला घेऊन तिचा निर्णय होत नव्हता. तिच्या आईवडिलांनी सिनेमा जगतात आपला यशस्वी काळ पूर्ण केला होता. तिचे वडिल तेव्हा पूर्णपपणे आपल्या राजकीय करिअरवर फोकस करत होते. यावेळी सोनाक्षीचं वजन इतकं जास्त वाढलं होतं की, तिला अभिनेत्री म्हणून कास्ट करणे एखाद्या डायरेक्टर, कास्टींग डायरेक्टर आणि अ‍ॅक्टरसाठी अवघड वाटेल.

https://www.instagram.com/p/B0QbKDtg6pR/

सलमान खान म्हणाला तुला सिनेमात घेईल परंतु…

जेव्हा सोनाक्षी आपल्या फिल्मी करिअरला घेऊन चिंतेत होती तेव्हा बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने तिला साथ दिली. सलमान म्हणाला मी तुला सिनेमात घेईल परंतु तुला तुझे वजन कमी करावे लागेल. सोनाक्षीने सांगितले की, ती खूप खात होती. खाण्याला कंट्रोल करणं खूप कष्टदायक असल्याचं तिने सांगितले.

दबंगमध्ये कामाच्या बदल्यात सलमानने कली ही मागणी

जेव्हा सलमानच्या सांगण्यावरून रात्रंदिवस मेहनत करून सोनाक्षीने आपले वजन कमी केले तेव्हा सलमानने तिच्याकडे नवीन मागणी केली. सलमानने दबंगमध्ये कामाच्या बदल्यात सोनाक्षीकडे ट्रीट मागितली. जेव्हा सलमानने ट्रीट मागितली तेव्हा तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते. तिने तिच्याकडील सर्व पैसे एकत्र केले तेव्हा तिच्याकडे एकूण 3 हजार रुपये जमा झाले. तिला वाटले की, 3 हजारात सलमानला ट्रीट कशी देणार. तिने ही ट्रीट टाळली. परंतु तिला आजही वाईट वाटत आहे की ती त्याला ट्रीट देऊ शकली नाही.

https://www.instagram.com/p/BzGFwsGgEIk/

 

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय