अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा विनाकारण ‘ट्रोल’, पार्टीच्या ‘व्हिडीओ’मुळं सोशलवर ‘राडा’, ट्रोलरला म्हणाली – ‘मुर्खा…’

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड स्टार सोनाक्षी सिन्हा तिच्या एका पोस्टमुळं चर्चेत आली आहे. तिनं तिच्या इंस्टा अकाऊंटवरून एक पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळं सोनाक्षी ट्रोल होताना दिसत आहे. लोकांनी तिचा चांगलाच समाचार घेतला आहे. परंतु या व्हिडीओमागील सत्य काही औरच होतं जे सोनाक्षीनं ट्रोल झाल्यानंतर कमेंट करत सांगितलं. याशिवाय ट्रोलर्सना प्रत्युत्तर देण्यासाठी सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा देखील पुढे आला होता.

सोनाक्षीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला. यात ती ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे. सोनाक्षी म्हणते, “हा #WorldHappynessDay आहे आणि डान्स मला खुश ठेवतो. सोबत मिळून कोरोनासोबत लढू या. स्वत:ला खुश ठेवायला काहीतरी शोधूया. असं काही तरी जे आपण घरीच करू शकतो. #jantaCurfew योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. घरीच रहा. पॅनिक होऊ नका. ज्येष्ठांची मदत करा. गाईडलाईन फॉलो करा. आनंद पसरवा.”

सोनाक्षीनं शेअर केलेला पार्टीवाला व्हिडीओ पाहून काही लोक खूपच भडकले. एकानं लिहिलं की, जर तू पालन करत नसेल तर उपदेशही देऊ नकोस. इतरांनीही वेगवेगळ्या कमेंट केल्या. लोकांनी तिला एवढं ट्रोल केलं की, तिला स्वत:ला याचं उत्तर द्यावं लागलं. ट्रोलर्सला उत्तर देत सोनाक्षीनं कमेंट केली की, मी घरीच आहे. मुर्खा. हा व्हिडीओ जुना आहे. याशिवाय तिचा भाऊ लव यानंही ट्रोलर्सला उत्तर दिलं.

त्या ट्रोलरला मुर्ख म्हटल्यावर तो खूप भडकला आणि वाईट साईट बोलू लागला. यावर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत ज्यांनी हे ट्रोलिंग चुकीच सांगत सोनाक्षी आणि लवला सपोर्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/B99KxujJUOq/

https://www.instagram.com/p/B95g5vTBxL1/

https://www.instagram.com/p/B94KDmDg04x/

https://www.instagram.com/p/B94KBnFALiD/

https://www.instagram.com/p/B91DH0EBgaz/

https://www.instagram.com/p/B9yc_JEhRzp/

https://www.instagram.com/p/B9vgMmigXRf/

https://www.instagram.com/p/B9jE_t0pCRl/

https://www.instagram.com/p/B9cmtChpiFF/

https://www.instagram.com/p/B9ZrlzCJWMV/

https://www.instagram.com/p/B9ELvuNBoAG/