Kangana Vs Taapsee War : तापसी पन्नूच्या सपोर्टसाठी पुढं आली सोनाक्षी सिन्हा ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौत आणि तापसी पन्नू यांच्या वादात अनेकांनी उडी घेतली आहे. काहींनी कंगनाला सपोर्ट केलाय तर काहींनी तापसी पन्नूला. वीर दास, स्वरा भास्कर, ऋचा चड्ढा यांच्या व्यतिरीक्त सोनाक्षीनं देखील तापसी पन्नूला सपोर्ट करत तिचं कौतुक केलं आहे. एक पोस्ट शेअर करत तिनं तापसीची बाजू घेतली आहे.

सोनाक्षीनं इंस्टावरून तापसीच्या इंटरव्ह्युचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉट सोबत सोनाक्षीनं लिहिलं की, “तुझा गर्व आहे तापसी. ज्या मर्यादेनं, परिपक्वतेनं आणि इमानदारीनं तू उत्तर दिलं आहे. तुला खूप सारी ताकद मिळो.”

नेमकं प्रकरण काय ?
एका मुलाखतीत बोलताना कंगना रणौत तापसी पन्नू आणि स्वर भास्करला बी ग्रेड अ‍ॅक्ट्रेस म्हणाली होती. यावर उत्तर देत तापसी म्हणाली होती की, होय मला अनेक सिनेमातून ड्रॉपाऊट केलं गेलं आहे आणि स्टार किड्सला रिप्लेस केलं गेलं आहे. परंतु सत्य हेही आहे की, तिनं आणि तिच्या बहिणीनं माझ्या हार्डवर्कसाठी मला डिस्क्रेडिट केलं. माझ्यावर टीका केली. माझ्यावर अनेक चुकीचे आरोप केले, जे अत्याचारासारखे आहेत. असं यामुळं झालं कारण मी त्यांच्या सुरात सूर मिसळण्यास नकार दिला म्हणून. मी हे पाहण्यासाठी नकार दिला की, ती आउटसाईडर्सची लिडर आहे. आम्ही सारे कटु लोक नाही आहोत.”