‘म्हणून मी विग काढून टाकला’, ‘बेबो’ करीनाच्या शोमध्ये सोनाली बेंद्रेचा ‘खुलासा’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं 2018 मध्ये सोशल मीडियावरून माहिती दिली होती की, ती हाय ग्रेड कॅन्सरसोबत झुंज देत आहे. यानंतर सर्वांनीच तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर आता ती बरी आणि तंदुरुस्त झाली आहे. अलीकडेच सोनाली बेंद्रे करीना कपूरचा शो व्हॉट वीमेन वॉन्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिनं आपल्या टफ जर्नीबद्दल सांगितलं.

करीनानं विचारलं की, उपचारानंतर घरातून बाहेर पडणं किती अवघड होतं ? यावर सोनाली म्हणाली, “आधी थोडं विचित्र वाटलं. नंतर मला वाटलं जे आहे ते का लपवायचं. जेव्हा मी न्यूयॉर्कमधून भारतात आले तेव्हा विग आणि व्हिल चेअरमुळं मी वैतागले होते. परंतु एअरपोर्टवर आल्यानंतर मी विग काढला. नंतर मी ठरवलं आता मी विग लावणार नाही. जे आहे ते सत्य आहे. आता मी असंच जाणार.”

https://youtu.be/g60u8IVbdJQ

सोनाली पुढे म्हणाली, “मी बोल्ड लुकमध्ये बाहेर आले होते. मला माहिती होतं की बाहेर मीडिया असेल. परंतु एवढ्या मोठ्या संख्येत असेल असं वाटलं नव्हतं. हे खूप कठिण होतं. कारण लोकांना मी कोण आहे ते माहीत होतं. त्यांनी मला आधीच पाहिलं होतं. आपण जे काम करतो त्यात लुक महत्त्वाचा असतो.” हे सगळं सांगताना सोनाली काहीशी इमोशनल झाली.

सोनाली म्हणाली, “तुम्ही जसे आहात तसे स्वत:वर प्रेम करा. लोक आपोआप तुमच्यावर प्रेम करतील. माझी महिलांना विनंती आहे की, आपल्या शरीराची कधीच लाज बाळगू नका. थोडा जरी डाऊट आला तरी चेकअप करून घ्या.”