‘या’ मराठी अभिनेत्रीचा नवरा झळकणार ‘शेरशाह’ सिनेमात, एकेकाळी काजोलच्या नवऱ्याची केली होती भूमिका

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपटात अनेक कलाकार जोड्या प्रसिद्ध झाल्या. आणि अजूनही रसिकांच्या मनात त्यांचे स्थान महत्वाचे आहे. मराठी चित्रपटसृष्टीतली अशीच एक जोडी आहे. ती म्हणजे सोनाली खरे आणि तिचे पती बिजय आनंद… यांनी एकेकाळी रसिकांच्या मनात राज्य केले होते. मधल्या काळात बिजय आनंद यांनी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. तब्बल सोळा वर्षानंतर पुन्हा त्यांनी मालिकेतून कमबॅक केले. आणि पुन्हा करिअरला सुरुवात केली. आता ते ‘शेरशाह’ चित्रपटात दिसणार आहे. अशी माहिती त्याने स्वतः सोशल मिडियावर दिली आहे.

त्यांनी इन्स्टाग्रामवर म्हंटले आहे की, धर्मा मुव्हिजच्या शेरशाह चित्रपटात काम करण्यासाठी मी खुप उत्सुक आहे. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. बिजय आनंद च्या पत्नीने देखील इन्स्टाग्रामवर याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून कारागील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. यामध्ये कारगील वॉर हिरो विक्रम बत्रा यांची कथा सांगण्यात येणार आहे. सिद्धार्थ आर्मी आफिसरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बिजय आनंद ची भूमिका कोणती आहे ते अजुनही गुलदस्त्यात आहे.

काजोल व अजय देवगण यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. बिजय ने त्याच्या अभिनयाने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. २००२ साली रामायणमध्ये त्याने लक्ष्मणची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते तब्बल १६ वर्ष बॉलिवूडमध्ये दिसले नाही. अचानक पुन्हा मालिकेत मुख्य भूमिका साकारून कमबॅक केले. आगामी चित्रपटात बिजय आनंद वेगळ्या भूमिकेत दिसेल अशी आशा आहे.