सलमान पेक्षा 9 वर्षाने लहान असलेली अभिनेत्री चित्रपटात त्याची ‘आई’ ; ट्रोलिंग सुरू, ट्रोलर्सना दिले ‘असे’ उत्‍तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खान, दिशा पाटनी आणि कॅटरीना कैफ स्टारर भारत सिनेमा सध्या चांगलाच गाजताना दिसत आहे. या सिनेमाची खूप चर्चा होताना दिसत आहे. परंतु या सिनेमातील एक अ‍ॅक्ट्रेस ट्रोल तिने केलेल्या रोलमुळे ट्रोल होताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णीने या सिनेमात सलमान खानच्या आईचा रोल केला आहे.

सोनाली कुलकर्णी ट्रोल होण्याचे कारण असे आहे की, तिचे वय 44 वर्षे आहे तर सलमान खान 53 वर्षांचा आहे. म्हणजे सलमानपेक्षा 9 वर्षांनी लहान असणाऱ्या सोनालीने सलमानच्या आईची भूमिका साकारली आहे. तिला सोशलवर ट्रोल करत नेटकऱ्यांनी अनेक सल्ले दिले आहेत.

ट्रोलर्सना उत्तर देताना सोनाली म्हणते…

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनाली कुलकर्णी म्हणते, “मी ज्या भूमिका साकारते त्या माझ्या मनाने करत असते. मला माझ्या निवडीचा अभिमान आहे. मी प्रेक्षक आणि ट्रोलर्स दोघांच्याही मतांचा आदर करते. मी 2000 साली आलेल्या ऋतिकच्या मिशन काश्मीर या सिनेमातही मी ऋतिकच्या आईची भूमिका साकारली होती. लोकं बोलणारच. लोकांचं बरोबरंही आहे. परंतु नेहमीच लोक टीका किंवा ट्रोल करतानाच नाही बोलत तर चिंता करतात म्हणूनही बोलत असतात.”

‘मी लोकांना नकारात्मक घेऊ इच्छित नाही’

पुढे बोलताना सोनाली म्हणते की, “अनेकदा लोक म्हणतात की, हिंदी सिनेमाच्या तुलनेत रिजनल सिनेमात मला चांगले रोल ऑफर कलेले आहेत. मला नाही वाटत की, मी असा काही विचार करत असेल की हिंदी सिनेमाने मला हे दिलं आणि ते दिलं. मी खूप खुश आहे. मी लोकांच्या कमेंट्सना समजू शकते. म्हणून मी त्यांना नकारात्मक घेऊ इच्छित नाही.”

सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सोनाली कुलकर्णीने मराठी, कन्नड, गुजराती अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. सलमान सोबत काम करूनही ती खूप खुश आहे. सोनाली सलमानच्या कामाने खूपच प्रभावित आहे असे सोनाली म्हणाली आहे. सोनालीने दिल चाहता है, सिंघम, टॅक्सी नंबर 9-2-11 यांसारख्या सिनेमात काम केले आहे.

सिने जगत –

‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ

सलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’

‘BIG BOSS MARATHI’ या शोला ‘कायदेशीर कारवाई’चे गालबोट ? ‘या’ अभिनेत्रीने दिली धमकी

#MeToo : अभिनेत्री तनुश्री दत्‍ता आणि नाना पाटेकर, आरोप प्रकरणाची मोठी बातमी ; घ्या जाणून

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like