अभिनेत्री सोनम कपूरनं मनातील सांगितलं ‘दुःख’ ; म्हणाली, माझ्यासोबत कोणीपण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूरने भलेही कमी चित्रपटामध्ये काम केले आहे. पण तिने इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ यानंतर ती खूपच चर्चेमध्ये आली होती. तिने अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर सोनम कपूरच्या करिअरमध्ये अशी वेळ आली होती. त्याचवेळी तिच्यासोबत बॉलिवूडचा एकही अभिनेता काम करण्यास तयार नव्हता. या गोष्टींचा सोनमने स्वतः खुलासा केला आहे.

२००७ मध्ये ‘सांवरिया’ चित्रपटामधून बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री सोनम कपूरने सांगितले की, मी सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी असल्यामुळे सगळ्यांना वाटते की, मी माझ्या वडिलांची लाडकी मुलगी आहे पण असे काही नाही. लोकांना हे माहित नाही की, ‘आईशा’ आणि ‘दिल्ली ६’ चित्रपटामध्ये करण्यासाठी मी ऑडीशन दिले होते. या ऑडीशनमध्ये पास झाल्यानंतर मला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.

सोनम कपूर म्हणाली की, ‘मी सांगू शकत नाही की ते माझ्यासाठी किती अवघड होते. तुम्हाला माहित नाही की, ‘खूबसूरत’ चित्रपटामध्ये मला खूप मेहनत घ्यावी लागली होती. कोणताच अभिनेता माझ्यासोबत काम करण्यास तयार नव्हता कारण चित्रपटाचे नाव ‘खूबसूरत’ होते. मला फवाद खान यांना पाकिस्तानमधून आणावे लागले आणि यानंतर पहा फवाद खान किती मोठे स्टार बनले. त्यांच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आला.’

अभिनेत्री सोनम कपूर हिने २००७ मध्ये आलेला संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘सांवरिया’ मधून पदार्पण केले होते. यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जसे की, ‘नीरजा’, ‘दिल्ली 6’, ‘एक लड़की देखा तो ऐसा लगा’, ‘वीरे दी वेडिंग’.

 

पृथ्वीवरील अमृत आहे गाईचे दूध, आहेत अनेक औषधी उपयोग 

तुमचे दात पिवळे तर नाहीत ना ? जाणून घ्या याची कारणे 

थोडे-थोडे खाण्याने चांगली राहते पचनक्रिया, दिवसभर मिळते ऊर्जा 

महिलांनी गर्भावस्थेत करावे कारल्याचे सेवन, होती अनेक फायदे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसह इतरांवर अ‍ॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मराठा आरक्षण झाले आता धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण हेच ध्येय : सुनिता गडा