डायरेक्टर अनुराग कश्यपनं सोनम कपूरला केलं ‘बर्थडे विश’, अभिनेत्रीच्या उत्तरानंतर लोकांनी उडवली ‘खिल्ली’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सोनम कपूर हिनं कालच (मंगळवार दि 9 जून 2020) आपला 35 वा वाढदिवस साजरा केला. या खास मोक्यावर ती मुंबईत आपल्या कुटुंबासोबत आहे. पती आनंद आहुजा देखील तिच्यासोबत होता. सोनमनं आनंदसाठी सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली होती. साऱ्यांनीच तिला शुभेच्छा दिल्या. डायरेक्टर अनुराग कश्यपनं देखील सोनमला विश केलं. यानंतर सोनमन अनुराग कश्यप च्या ट्विटला उत्तर दिलं. परंतु यामुळं ती अनेकांच्या निशाण्यावर आली.

अनुराग कश्यपनं ट्विट करत सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या अनुराग कश्यपनं लिहिलं की, “हॅप्पी बर्थडे मुली. तुला आणखी शक्ती मिळो.” अनुरागच्या ट्विटला उत्तर देताना सोनमनं लिहिलं की, “थँक्यु डार्लिंग अनुराग. तुमच्यासोबत काम करण्यासाठी आता जास्त वाट पाहवत नाही.”

सोनमचं हे उत्तर पाहिल्यानंतर लगेचच लोक तिला ट्रोल करू लागले. एकानं कमेंट केली की, तो फ्लॉप सिनेमे तयार करतो. एखाद्या चांगल्या डायरेक्टरसोबत काम कर. एकानं तर अनुराग आणि सोनमची खिल्ली उडवत लिहिलं की, तो सिनेमा कमाल असणार आहे ज्यात डायरेक्शन अनुराग कश्यपचं आणि अ‍ॅक्टींग सोनमची असेल. एकाच्या डायरेक्शनची आणि दुसरीच्या अ‍ॅक्टींगची चर्चा साऱ्या युनिव्हर्समध्ये आहे.

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग, खूबसुरत, पॅड मॅन, संजू, प्रेम रतन धन पायो, नीरजा अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.