पती ‘आनंद’नं वरातीला का आणला नव्हता घोडा ? ‘सोनम’नं कारण सांगितल्यानंतर लोकांनी केलं ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सोनम कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंड आनंद आहुजा सोबतच्या लग्नाच्या पोस्टमुळं ट्रोल होताना दिसत आहे. आनंद आणि सोनमचं मुंबईतील एका नातेवाईकाच्या घरी लग्न केलं होतं. लग्नात आनंद घोड्यावर बसून वरात घेऊन का नव्हता आला याचा खुलासा सोनमनं केला आहे. हे सांगताना तिनं पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (पेटा) इंडियाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. परंतु या व्हिडीओनंतर मात्र लोकांनी तिचं कौतुक करण्याऐवजी तिला ट्रोल करायला सुरुवा केली आहे.

पेटा इंडियानं आज सकाळी एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, लग्नात वापर होणाऱ्या घोड्यांसोबत कशी वाईट वर्तणूक केली जाते. पेटानं या व्हिडीओत अनेक बॉलिवूड स्टार्सला टॅग केलं आहे. सोनमलाही यात टॅग करण्यात आलं आहे. सोनमनं रिट्विट करत हा व्हिडीओ शेअर केला आणि म्हणाली, “हेच कारण होतं की, माझा पती लग्नात घोडा आणि लाऊड म्युझिक सोबत वरात घेऊन आला नव्हता.”

सोनमच्या या ट्विटनंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एकानं म्हटलं आहे की, जर आम्ही म्हणालो की, आम्ही गायीला पुजतो आणि आम्ही त्यांचं सरंक्षण करू इच्छित आहोत तर आम्ही लगेच संघी म्हणवले जातो. बॉलिवूडचं पशुप्रेम फक्त कुत्र, मांजर, घोडा यांच्यापर्यंतच मर्यादित आहे.

आणखी एकानं म्हटलं आहे की, तुमचं लग्न व्हेजिटेरियन होतं की, फक्त घोड्याचंच नशीब चांगलं होतं. एकानं असं लिहिलं की, पब्लिकमध्ये ड्रामा करते, आपली लग्जरियस लाईफ जगते. यामुळे पर्यावरणाचं किती नुकसान होत असेल.”

2018 मध्ये सोनमला वेगन इटींग आणि तिचा ब्रँड ‘रीसन’च्या हँडबॅग्समध्ये जनावरांच्या त्वचेचा वापर न करण्यासाठी पेजाचा पर्सन ऑफ द ईयर हा अवॉर्ड मिळाला आहे.

 

You might also like