Coronavirus : ‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी बॉलिवूड गाण्याचं ‘मॅशअ‍ॅप’, रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चीनमधून पसरलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसने जगभरात उच्छाद मांडला आहे. भारतातही ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या १७७ झाली आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक ४९ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सत्कारसोबतच राज्य सरकारही अनेक महत्वाची पावले उचलत आहे. त्यात खासदार अमोल कोल्हेंनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी एक व्हिडीओ ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.

यात रोहित पवार यांनी एक मजेशीर व्हिडीओ केला आहे. ज्यात त्यांनी कोरोनापासून वाचण्याचे १० उपाय सुचवले आहेत. हे उपाय सांगताना त्यांनी प्रत्येक उपायानंतर त्या संबंधित एखादी जाहिरात किंवा चित्रपटांमधील जाण्याच्या वापर केला आहे.

१) जागरुक राहा

२) हात स्वच्छ धुवा

३) गर्दी टाळा

४) हाताने तोंडाला आणि इतरत्र स्पर्श करु नका

५) सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्यांनी रुमाल किंवा मास्कचा नियमित वापर करा

६) घर, परिसर स्वच्छ ठेवा

७) एकटे राहणे सर्वोत्तम

८) सर्दी, ताप, खोकला, उलटी होत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.

९) अफवा पसरवू नका

१०) सुरक्षित राहा

हे ट्विट करत रोहित पवारांनी म्हंटले कि, कोरोनाविरोधात लढताना प्रत्यक्षात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ. लोकांमधील भीती दूर करुन जागृती करण्यासाठी रोज सकाळी 9 वा. कोरोनाबाबत जनजागृती करणारी बातमी/माहिती मी सोशल मीडियातून शेअर करणार तुम्हीही शेअर करा. मित्राने बनवलेला असाच एक व्हिडिओ मी शेअर करतोय.

दरम्यान, १८ मार्च रोजी खासदार अमोल कोल्हे यांनी अशाचप्रकारे ‘कोरोना’पासून बचावासाठी एक भन्नाट आयडिया सुचवली होती. ‘हात धुवा, हात धुवा, हात धुवा, असे धुवा, तसे धुवा, ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? ऐकण्याचा कंटाळा येऊ द्या, हात धुण्याचा मात्र कंटाळा करु नका, असे अमोल कोल्हेंनी या व्हिडीओत म्हटलं आहे. ‘अत्यंत सोपी आणि साधी हात धुण्याची पद्धत आहे. त्यासाठी SUMAN M’ हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हे चाललं पाहिजे. S – सरळ, U- उलट, M – मूठ, A- अंगठा, N – नखं आणि M म्हणजे मनगट,’ असे अमोल कोल्हेंनी या व्हिडीओत म्हटलं आहे.