Zaroorat Song Release : शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी एकाच गाण्यात, ‘जरूरत’ गाणं झालं रिलीज

पोलीसनामा ऑनलाइन टीम : सध्या लोकांमध्ये बंधुभाव, सहनशीलता, सामाजिक बांधिलकी या गोष्टींची कुठे तरी कमतरता भासत आहे. आणि याच गोष्टी लक्षात ठेऊन शत्रूघ्न सिन्हा आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे आजच्या गरजेनुसार सामाजिक बांधिलकी चा संदेश देणारे, बंधुभाव जपणारे, सहनशीलता शिकविणारे गाणं घेऊन आले आहेत.

 

शत्रूघ्न सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा हे म्हणाले की, हे गाणे नक्कीच लोकांना आवडेल अशी अपेक्षा करतो. हे गाणे मानवी जीवनात आपल्याला सहनशीलता शिकवणारे आहे.

या दोघांव्यतिरिक्त गाण्यामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्ती आहेत. डॉ किरण बेदी, पद्मविभूषण खा.डॉ. सोनल मानसिंह, लक्ष्मी अग्रवाल, लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि अँनी चॉइंग ड्रोलमा आदींचा समावेश यात आहे. गाण्याचे दिग्दर्शन वरुण गुप्ता यांनी केले आहे.

हे गाणे रिलीज झाल्यावर शत्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा म्हणाले की, ‘या गाण्याबद्दल प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. या गाण्याला ‘जरूरत’ असे नाव देण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर पासून हे गाणं सर्व ठिकाणी उपलब्ध असणार आहे…