आलिया भटच्या मम्मीच्या स्विमिंग पूलमध्ये घुसला साप, पुढं झालं ‘असं’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार आलिया भटची आई सोनी राजदान सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील अनेक अपडेट्स ती सोशलवर शेअर करत असते. अलीकडेच सोनी राजदाननं दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते अवाक् झाले आहेत. रणबीर कपूरची आई नीत कपूरनंही यावर कमेंट केली आहे. या व्हिडीओत सोनीच्या स्विमिंग पूलमध्ये चक्क साप आल्याचं दिसत आहे,.

सोनी राजदाननं इंस्टावरून दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत एक साप स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना सोनी म्हणते, “आमच्या स्विमिंग पूलमध्ये आज एक गेस्ट दिसला. आधी तर त्याला पाणी प्यायचं होतं. परंतु नंतर त्यानं पाण्यात बुडी मारली यानंतर तो पोहत झाडांमध्ये निघून गेला.”

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण अवाक् झाले आणि त्यांनी चिंता व्यक्त केली. रणबीर कपूरची आई नीतू कपूरनं कमेंट केली, हे खपू भीतीदायक आहे. यावर सोनी राजदाननं कमेंट करत रिप्लाय दिला की, मी तर 9 वर्षात पहिल्यांदाच इथं साप पाहिलाय.

सोनीच्या चाहत्यांनीही यावर कमेंट केलीय आणि तिला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. परंतु अद्याप आलियाची यावर काहीही रिअॅक्शन आलेली दिसत नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like