सोनू सूदनं आता केला 1 लाख स्थलांतरित मजूरांना नोकरी देण्याचा वादा, केली ‘ही’ पोस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या कोरोना विषाणू साथीच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी मसीहा असल्याचे सिद्ध झाले आहे. सोनू सूदकडून जे काही होत आहे ते या प्रवासी मजुरांसाठी करीत आहेत. मग त्यांना त्यांच्या घरी सोडवायचे असेल, जेवणाची व्यवस्था करायची असेल किंवा त्यांना नोकरी द्यायची असेल. होय, सोनू सूद यांनी आता स्थलांतरित कामगारांना नोकरी देण्याचे आश्वासन देखील दिले आहे. तेही 1 लाख कामगारांना.

याबाबत सोनू सूद यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. अभिनेत्याने आपल्या ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे की त्यांनी अ‍ॅपेक (APEC) नावाच्या कंपनीशी हात मिळवणी केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते 1 लाख कामगारांना नोकरी देतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. अभिनेत्याने ट्वीट करून असे लिहिले आहे की, ‘इच्छा तेथे मार्ग!’ http://Pravasirojgar.com च्या माध्यमातून देशभरात ‘अ‍ॅपरेल मॅन्युफॅक्चरिंग अ‍ॅन्ड एक्सपोर्ट कंपन्यां’मध्ये 1 लाख रोजगार देण्याचे मोठे वचन. धन्यवाद #AEPC #AbIndiaBanegaKamyaab, Jai hind।

यापूर्वीही 3 लाख स्थलांतरित मजुरांना नोकरी देण्याचे आश्वासन या अभिनेत्याने दिले आहे. 30 जुलै रोजी अभिनेत्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली होती. सोनू सूद यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या स्थलांतरित बांधवांसाठी http://PravasiRojgar.com चा 3 लाख नोकऱ्यांसाठी माझा करार. हे सर्व चांगले पगार, पीएफ, ईएसआय आणि इतर फायदे प्रदान करतात. धन्यवाद AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea और अन्य सभी का। #AbIndiaBanegaKamyaab।

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like