महिलेनं मागितली सोनू सूदकडे मदत, म्हणाली – ‘पतीसोबत एक क्षणही राहू शकत नाही’ ! अ‍ॅक्टरनं दिला ‘रोचक’ सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सोनू सूद सध्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मदत करत आहे. त्याच्यामुळं अनेकजण सध्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत टाईम स्पेंड करत आहेत. सोनू या मजुरांची मदत एखाद्या देवदूताप्रमाणे करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर किंवा कॉलवर त्यांच्या घरी सोडत आहे. सोनू सूदनं मजुरांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबरही प्रसिद्ध केला आहे. सर्वजण सोनूचं कौतुक करत आहेत. अशातच सोनूला एका महिलेनं पती पासून दूर जाण्यासाठी मदत मागितली आहे. यावर सोनूनं खूप मजेदार अंदाजात उपाय सुचवला आहे.

एका युजरनं लिहिलं की, “जनता कर्फ्युपासून तर लॉकडाऊन 4 पर्यंत मी माझ्या पतीसोबत रहात आहे. तुम्ही मला किंवा त्यांना माझ्या आईकडे सोडू शकता का. कारण मी आता त्यांच्यासोबत नाही राहू शकत.”

सोनूनं तिला मजेदार अंदाजात सोल्युशन सांगितलं आहे. सोनूनं उत्तर दिलं की, माझ्याकडे एक जास्त चांगला प्लॅन आहे. मी तुम्हाला दोघांनाही गोव्याला पाठवतो. कस राहिल ?

सोनू अशी रिक्वेस्ट येण्याची ही तशी काही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत सोनूला एका महिलेनं पार्लरला सोडण्याची विंती केली होती तर एकानं आपल्या गर्लफ्रेंडकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोनूनं या सर्वांनाही उत्तरही दिली आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like