सोनू सूदनं केला ‘लॉकडाऊन’मध्ये मृत आणि जखमी प्रवासी मजुरांच्या 400 कुटुंबाना मदत करण्याचा संकल्प !

पोलिसनामा ऑनलाइन – अभिनेता सोनू सूदनं कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये मृत किंवा जखमी झालेल्या प्रवासी मजुरांच्या 400 हून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प केला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड सहित विविध राज्यातील अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून सोनूनं लॉकडाऊनमध्ये जीव गमावलेल्या प्रवासी मजुरांचे पत्ते आणि बँक तपशील घेतला आहे.

सोनू सूदनं एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, “मी जीव गमावलेल्या किंवा जखमी प्रवासी मजुरांच्या कुटुंबीयांना सुरक्षित भविष्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मला वाटंत की, त्यांची मदत करणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे.

सोनूनं लॉकडाऊनमध्ये 300 हून अधिक प्रवासी मजुरांना मदत केली आहे आणि त्यांना सुरक्षित आपल्या घरी पोहोचवलं आहे.

जसा लॉकडाऊन लागू झाला आहे. तसा सोनू कायमच चर्चेत येताना दिसत आहे. कोणी त्याला हिरो म्हणत आहे तर कोणी त्याचे आभार मानत आहे. लॉकडाऊनमध्ये त्यानं अनेकांची खूप मदत केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like