आता बरोजगारांना रोजगार देणार सोनू सूद ! ‘ई-रिक्षा’ देऊन बनवणार ‘आत्मनिर्भर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये (COVID-19 pandemic Lockdown) सतत लोकांची मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अजूनही चर्चेत आहे. या सकंटकाळात अनेक ठिकाणी अडकलेल्या लोकांची तो सतत मदत करताना दिसला होता. पडद्यावरील हा खलनायक रिअल लाईफ सुपरहिरो ठरताना दिसला. अनेक गरिबांना, बेरोजगारांना, विद्यार्थ्यांनाही त्यानं आजवर मदत केली. आता कोरोना काळात नोकरी गमावणाऱ्या बेरोजगारांना सोनू रोजगार उपलब्ध करून देणार आहे.

नोकरीची गरज असणाऱ्यांसाठी आता सोनूनं ई रिक्षा देण्याची योजना बनवली आहे. सोनूनं स्वत: कमवा घर चालवा नावाची एक नवीन कॉन्सेप्ट आणली आहे. याच्या मदतीनं आता गरजू युवक ही रिक्षा घेऊ शकतात. याच्या मदतीनं सोनू अशा लोकांना आत्मनिर्भर बनण्याची संधी देत आहे ज्यांची नोकरी कोरोना काळात गेली आहे.

सोनूनं या नवीन योजनेबद्दल ट्विटर आणि इंस्टावर पोस्टही शेअर केली आहे ज्यातून त्यानं लोकांना या योजनेची माहिती दिली आहे. लोकांना आत्मनिर्भर करण्यासाठी एक छोटसं पाऊल असंही त्यानं म्हटलं आहे.

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रोहित शेट्टी डायरेक्टेड सिंबा सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या सिनेमात रणवीर सिंग आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत होते. सोनूनं बॉलिवूडसोबतच अनेक साऊथ इंडियन सिनेमातही काम केलं आहे.