शेतकरी आंदोलनावर बोलला सोनू सूद ! Tweet मध्ये लिहले फक्त ‘हे’ 3 शब्द

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन असंच सुरू राहिल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. याला अनेक सेलेब्सनंही पाठींबा दिला आहे. फेमस सिंगर रुपिंदर हांडा (Rupinder Handa) हिनंही याला पाठींबा दिला होता.शेतकऱ्यांचं आंदोलन पाहून रुपिंदर भावूक झाली होती. तिनं व्हिडीओ शेअर करत यावर भाष्य केलं होतं. बॉलिवूड आणि पंजाबी सिंगर मिका सिंग, अ‍ॅक्ट्रेस हिमांशी खुराना, पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ यांनीही या याला पाठींबा दिला आहे. आता बॉलिवूड स्टार सोनू सूद (Sonu Sood) यानंही या आंदोलनाचं समर्थन केलं आहे.

अभिनेता सोनू सूदनं शेतकऱ्यांचं समर्थन करत ट्विट केलं आहे. शेतकऱ्यांचं महत्त्व सांगताना त्यानं शेतकऱ्यांना हिंदुस्तान म्हटलं आहे. सोनूनं ट्विटमध्ये फक्त 3 शब्द लिहले आहेत. सोनूनं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, शेतकरी हिंदुस्तान आहेत.

सोनूचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत त्यांचं म्हणणं मांडलं आहे. अनेकांनी सोनूचं कौतुक केलं आहे.

सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रोहित शेट्टी डायरेक्टेड सिंबा सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या सिनेमात रणवीर सिंग आणि सारा अली खान प्रमुख भूमिकेत होते. सोनूनं बॉलिवूडसोबतच अनेक साऊथ इंडियन सिनेमातेही काम केलं आहे.