सोनू सूदला एकजण म्हणाला – ‘भाई ठेक्यावर पोहोचव’ ! अभिनेत्यानं दिलं जोरदार ‘प्रत्युत्तर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सोनू सूद मुंबई आणि आसपासच्या भागात अडकलेल्या मजुरांना एका मेसेजवर किवा एका ट्विटवर त्यांच्या घरी पोहोचण्यासठी मदत करत आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. सोनूच्या ट्विटर वॉलवर अनेक ट्विट्स दिसत आहेत. यात एक असं ट्विट आहे जे वाचून तुम्ही नक्कीच हसाल. एका युजरनं म्हटलं की, सोनू भाई मी घरात अडकलो आहे. प्लिज मला ठेक्यावर पोहोचवा. सोनूनंही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सोनू म्हणतो, भाई मी ठेक्यावरून घरी पोहोचू शकतो. गरज पडल्यास नक्की सांग.”

सोनूनं स्वत: बसची सोय केली आहे आणि तो मजुरांची मदत करत आहे. या कामासाठी तो इतरांवर अजिबात अवलंबून नाही. सध्या सोनूचं हे ट्विट सोशलवर जोरदार व्हायल होत आहे. सोनून करत असलेल्या कामाचं अनेकजण कौतुक करत आहे. आतापर्यंत त्यानं अनेक मजुरांना मदत केली आहे.

सोनूच्या ट्विटनंतर सोशलवर इतरही अनके युजर आहेत जे यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी त्याचं ट्विट शेअरही केलं आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like