वडिलांनी नेहमीच ‘अडचणी’ वाढवल्या, मला ‘बळी’चा ‘बकरा’ बनवलं, आदित्य पंचोलीचा मुलगा ‘सुरज’नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हीरो या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सुरज पंचोलीचे आयुष्य देखील आपल्या पिताप्रमाणे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. अभिनेत्री जिया खानाने आत्महत्या केल्या प्रकरणी सूरजला जेलमध्ये देखील जावे लागले होते. नुकतेच सुरज ने आपल्या खाजगी आयुष्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरज पंचोली म्हणतो, माझे वडील (आदित्य पंचोली ) नेहमीच चुका करतात, तेच अनेक अडचणी निर्माण करून ठेवतात. लोक मला त्यांच्यासारखे समजतात परंतु मी माझ्या आईप्रमाणे आहे. माझ्याकडे वडिलांचे आडनाव आहे त्याला मी काहीच करू शकत नसल्याचे सुरजणे सांगितले.

जिया खान प्रकरणावर बोलताना सूरज पंचोली म्हणतो, लोकांनी लोकांच्या भावनांची काळजी घेणं बंद केलं आहे. माझ्याबद्दल जे काही सांगितले गेले ते खोटे होते. कोणीही काहीही सिद्ध करू शकले नाही आणि मला खात्री आहे की कोणीही करू शकत नाही, कारण मला माहित आहे की मी काहीही चूक केली नाही. परंतु कोणाला तरी बकरा करावे लागणार होते, मग मला केले.

जर मी सिनेसृष्टीतील कोणी नसतो तर कदाचित एवढा गोंधळ झाला नसता याबाबत चित्रपट क्षेत्रातून मिळालेल्या समर्थनार्थ सुरज पंचोली म्हणाला, मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा नाही कारण ही माझी लढाई आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/