‘सूर्यवंशी’च्या ट्रेलरमध्ये चाहत्यांनी पकडली ‘ही’ चूक, अजय देवगणच्या एन्ट्रीसोबत ‘कनेक्शन’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रोहित शेट्टीनं डायेरक्ट केलेला बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ स्टारर सूर्यवंशी या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. रिलीज होताच हा ट्रेलर युट्युबवर ट्रेंड करताना दिसत आहे. 24 तासांतच या व्हिडीओला 4 कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या सिनेमात सिंघम अजय देवगण आणि सिंबा रणवीर सिंग हेदेखील एन्ट्री मारणार आहेत. सिनेमाचा ट्रेलर तर धमाकेदार आहे. परंतु रोहित शेट्टीनं यात चूक केल्याचं दिसत आहे.

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अजय देगवणच्या एन्ट्रीच्यावेळी एक झोल झाल्याचं दिसत आहे. शुटींगदरम्यान हे रोहित शेट्टीला कसं दिसलं नाही ही आश्चर्याची बाब आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, अजय देवगण एका बुलेटप्रुफ जीपमधून जोरदार एन्ट्री करतो. परंतु या बुलेटप्रुफ जीपचा दरवाजा मात्र लाकडाचा बनला आहे. याची किनार नीट पेंट न केल्यानं ज्यांनी ट्रेलर पाहिला त्यांच्या लक्षात ही बाब आली नाही. याचे अनेक स्क्रीनशॉटही सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अजय देवगणची एन्ट्री एक महत्त्वपूर्ण सीन आहे जो क्लायमॅक्स आहे. परंतु मेकर्सकडून थोडी चूक झाल्याचं दिसत आहे. सूर्यवंशी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.