दक्षिणेतील अभिनेते ब्रह्मानंदम यांचा आज ‘बर्थडे’, 1 हजाराहून जास्त सिनेमात केला अभिनय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ इंडस्ट्रीतील फेमस कॉमेडी अ‍ॅक्टर ब्रह्मानंदम सर्वांनाच माहिती आहेत. आज ब्रह्मानंदम यांचा 63 वा वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मानंदम यांचे किती सिनेमे झाले आहेत. अनेकांनाच याबाबत माहिती नसेल परंतु ब्रह्मानंदम यांनी आतापर्यंत 1 हजाराहून अधिक सिनेमे केले आहेत. कॉमेडियन म्हणून लोकांना ते खूप आवडतात.

ब्रह्मानंदम तेलगू सिनेमातील खूप मोठं नाव आहे. त्यांची अ‍ॅक्टींग एवढी दमदार आहे की, ते ज्या सिनेमात असतात ते सिनेमे हिट होतात. त्यांचे सिनेमे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करत असतात. हेच कारण आहे की, ते साऊथमधील अधिकाधिक सिनेमात असतात. त्यांच्याशिवाय साऊथ सिनेमे पूर्ण होत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त #Brahmanandam हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करताना दिसत आहे. त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात शुभेच्छा येताना दिसत आहेत.

ब्रह्मानंदम यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1956 रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झाला होता. त्यांनी लक्ष्मीसोबत लग्न केलं. ब्रह्मानंदम यांना दोन मुलं आहेत. राजा आणि गौतम अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या नावावर कोणत्याही जिवंत अ‍ॅक्टरकडून सर्वाधिक स्क्रीन क्रेडिटचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यांना भारतीय सिनेमातील उत्कृष्ट योगदानासाठी 2009 मध्ये पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे.

ब्रह्मानंदम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 1987 साली आलेल्या अह ना पेलांता या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आपल्या दमदार अ‍ॅक्टींगसाठी त्यांना 5 नंदी अवॉर्ड मिळाले आहेत. त्यांना फिल्म फेअर बेस्ट कॉमेडियन अवॉर्ड (तेलगू) मिळाला आहे. त्यांना बेस्ट कॉमेडियन म्हणून cineMAA अवॉर्डही देण्यात आला आहे. त्यांनी तेलगू सोबत कन्नड आणि तमिळ सिनेमातही काम केलं आहे.

ब्रह्मानंद यांना त्यांच्या कॉमिक टायमिंग, मजेदार पात्र, आणि पडद्यावरील मस्तीसाठी ओळखलं जातं. जानेवारी 2019 मध्ये ब्रह्मानंद यांची मुंबईतील एशियन हार्ट इंस्टीट्युट मध्ये बायपास सर्जरीही करण्यात आली आहे.