‘श्रीदेवीचा मृत्यू अपघात नसून मर्डर’, ‘मित्राकडे पुरावे’ ; ‘या’ IPS ऑफिसरचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीदेवीच्या मृत्यूविषयी, केरळ डीजीपी जेल आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी आश्चर्यचकित दावा केला आहे. त्यांचा दावा आहे की, सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये बुडल्याने नाही तर तिचा मर्डर झाला होता. आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंहने आपल्या मित्राद्वारे हा दावा केला आहे की, त्यांचे मित्र डॉ. उमादथन प्रसिद्ध फोरेंसिक सर्जन होते. नुकतेच त्यांचे निधन झाले आहे.

आयपीएस अधिकारीने श्रीदेवीच्या मृत्यूचा खुलासा केला आहे. समोर आलेल्या माहितीनूसार, ऋषिराज सिंह यांनी सांगितले की, ‘मी माझा मित्र डॉ. उमादथनला श्रीदेवीच्या मुत्यूबद्दल विचारले होते पण त्यांच्या उत्तराने मला धक्का बसला. त्यांनी सांगितले की, रिसर्चच्या दरम्यान असा अंदाज लावला जात होता की, श्रीदेवीचा मृत्यू झाला नसून तिचा मर्डर केला गेला होता. ‘

ऋषिराज सिंह यांनी आपला मित्र डॉ. उमादथन यांच्या मृत्यूवर एक लेख लिहला होता. यामध्ये त्यांनी आपल्या मित्राच्या गुन्हा आणि मर्डरच्या माहितीबद्दल आश्चर्यचकीत उल्लेख केला होता. त्यामध्येच त्यांनी श्रीदेवीच्या मृत्यूचा पण उल्लेख केला आहे. ऋषिराज यांनी लिहले की, ‘माझ्या मित्राने सांगितले की, कोणताही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये एका बाथटबमध्ये डूबून मरु शकत नाही.’

मागील वर्षी २४ फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलमध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिच्या मृत्यूचे कारण अपघात सांगितला होता. असे सांगितले गेले होते की, तिचा मृत्यू नशमुळे बाथटबमध्ये बुडून झाला होता. श्रीदेवी त्यावेळी मोहित मारवाह यांच्या लग्नाला गेली होती त्याचवेळी तिचे पती बोनी कपूरदेखील तिथे गेले होते.

ऋषिराज यांनी लेखमध्ये लिहले की, ‘हे शक्य नाही की, कोणी एक फुट बाथटबमध्ये डुबून मरत नाही. माझ्या मित्राने सांगितले होते की, एखाद्या व्यक्तीला एक फुट बाथटबमध्ये कोणीतरी जबरदस्तीने बुडवून मारु शकतो. मित्राचा दावा होता की, तिचे पाय कोणीतरी पकडले असतील यांनतर श्रीदेवीचे डोके पाण्यात बुडवले गेले.’

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर दुबई पोलिसांनी दीर्घ चौकशी केली. परंतु पुराव्याच्या अभावामुळे त्याच्या मृत्यूचे वास्तविक कारण कळाले नाही. तिचा मृत्यू एक अपघात सांगितला होता. यानंतर, साडेतीन वर्षांनंतर डी.सी.पी. ऋषिराज सिंगच्या मित्राने लिहिलेल्या लेखांमुळे पुन्हा वादविवादाने वाढला आहे.डीजीपी आपल्या मित्राद्वारे असे दावे करत आहे.

डॉ. उमादथन ७३ वर्षी केरळच्या हॉस्पिटमध्ये झाले. ते सरकारचे सर्वात विश्वसनीय केस-निराकरण करणारे डॉक्टर होते. केरळ सरकारने त्यांना मेडिको-कायदेशीर सल्लागार पदाद्वारे जोडले होते. सरकारही त्यांच्याकडे अशा प्रकरणांमध्ये मदत मागत होते.

डॉ. उमादथन यांनी तिरुवनंतपुरम, अलपुझा, कोट्टायम, त्रिशूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये फॉरेंसिक मेडिसिन प्रोफेसरचे काम केले होते. त्यांना अशी प्रकरणे सोडविण्यासाठी लीबियाई सरकारने आपले मेडिको-कायदेशीर सल्लागार बनवले होते.

अप्राकृतिक मृत्यूची तपासणी करण्यासाठी केरळ पोलिसांनी त्यांची निवड केली होती. ते फॉरेंसिक औषधांच्या व्यावहारिक पद्धतींचा तपास करीत असे. ते फोरेंसिक मेडिसिन पोलिसांमध्ये सहभागी होते. त्यांना पोलीस सर्जन म्हणून ओळखले जात होते. त्यांनी या विषयावर अनेक पुस्तके लिहली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तुमच्याही स्वयंपाकघरात आहे, हे अनेक आजारांवरील रामबाण औषध

‘हे’ आहेत प्रोस्टेट कॅन्सर बाबतचे ‘समज-गैरसमज’, जाणून घ्या

डोळयातून पाणी येतंय मग ‘या’ ४ गोष्टींचा काळजी घ्या

बहुजननामा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या कामाची पॅलेस्टाईनने घेतली दखल, पॅलेस्टाईन सरकारकडून सन्मान

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आघाडी काळात रखडलेल्या मराठा मुलांना न्याय, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

सिनेजगत

Photo : ४२ वर्षांच्या ‘या’ अभिनेत्रीने केलं गुपचूप लग्न !

Photos : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नेंट अॅमी जॅक्शनची इटलीतील वॅकेशनदरम्यान ‘धमाल’ !

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात फसवणुकीचा FIR