अभिनेता सुशांतच्या पोस्टमार्टम अहवालात गडबड, AIIMS च्या फॉरेन्सिक प्रमुखांचा दावा

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. दरम्यान सीबीआयने नियुक्त केलेले एम्सचे फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. सुधीर गुप्ता यांनी सुशांतच्या पोस्टमार्टम अहवालाबाबत भाष्य केले आहे. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये टाइम स्टँप नाही. मुंबई पोलिसांना या अहवालाबाबत दुसरे कन्सल्टेशन घेणे आवश्यक होते, मात्र तसे त्यांनी केले नाही. त्यामुळे अहवालात गडबड असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फॉरेन्सिकने वेळेच्या बाबतीत गोळा केलेल्या पुराव्यांबाबत सीबीआयने शंका उपस्थित केली आहे. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीमवर देखील शंका उपस्थित केली आहे. याचबरोबर असा आरोप देखील केला जात आहे की, नियमांनुसार पुरावे आणि गोळा करण्यात आल्या नाही आहेत तसेच त्या सीबीआयकडे देण्यात देखील आल्या नाही आहेत. एका अहवालानुसार वेळेवर सुशांतचा लॅपटॉप आणि फोन फॉरेन्सिककडे पोहचवण्यात आला नाही. सुशांतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसबरोबर छेडछाड करण्यात आली आहे. 24 दिवसांनंतर सुशांतचा फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी देण्यात आला. काल दुपारी सीबीआयचे एक पथक कूपर रुग्णालयात दाखल झाले होते. सुमारे तासाभराने ते पथर रुग्णालयाबाहेर आले. तिथे सीबीआयने सुशांतची अटॉप्सी करणार्‍या डॉक्टरांच्या टीमची चौकशी केली. सुशांतच्या पोस्टमार्टमवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. या अहवालानुसार, सुशांतच्या मृतदेहाच्या छायाचित्राबाबत सीबीआय टीम समाधानी नाही. सीबीआयने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीची देखील चौकशी केली. चक्रवर्ती परिवारातील रोहित पहिला सदस्य आहे, ज्याची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे सुशा्ंतचा कुक नीरज आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याची देखील चौकशी करण्यात येत आहे.