‘त्या’ वक्तव्यावरून अभिनेत्री स्वरा भास्करची MIM च्या वारिस पठाण यांच्यावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस स्वरा भास्कर आपल्या बिंधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. कोणत्याही मद्द्यावर ती आपलं मत बिंधास्तपणे मांडत असते. सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला अनेक स्तरातून विरोध होत आहे. अशात स्वरानं वारिस पठाण यांनी कर्नाटकात केलेल्या चिथावणीखोर वक्त्व्यावरून त्यांच्यावर टीका केला आहे. स्वरानं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्वरा भास्कर तिच्या ट्विटमध्ये म्हणाली, “वारिस पठाण यांच्या वक्तव्यामुळे CAA आणि NRC विरोधात केलं जात असलेल्या आंदोलनाला वेगळं वळण मिळू शकतं. जर तुम्ही CAA आणि NRC विरोधात फायद्याचं बोलू शकत नसाल तर किमान काहीतरी बरळू नका. आपण केलेलं वक्तव्य बेजबाबदार आणि अत्यंत निदंनीय आहे.” असं स्वरा म्हणाली.

काय म्हणाले वारिस पठाण ?

गुरुवारी कर्नाटकात CAA आणि NRC विरोधात झालेल्या आंदोलनात वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. वारिस पठाण म्हणाले, “इट का जवाब पत्थर से हे आता आम्ही शिकलो आहोत. ते मागून मिळालं नाही तर हिसकावून घ्या.आम्ही मुद्दाम महिलांना पुढे केलं आहे. विचार करा फक्त आमच्या सिंहीणी पुढे आल्या आहेत तर यांचा घाम निघालाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर आलो तर काय होईल. आम्ही 15 कोटी आहोत परंतु 100 कोटींवार भारी आहोत हे लक्षात ठेवा.” अशा प्रकारे एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी चिथावणीखोर आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते.

You might also like