नावातच सर्वकाही, ‘बिग बी’ यांच्यासह ‘या’ 14 दिग्गज कलाकारांनी करिअरसाठी बदललं नाव, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – करिअर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करावा लागतो. मेहनत केल्याशिवाय करिअरमध्ये यश मिळत नाही. त्यामुळे करिअर करण्यासाठी कष्ट तितकेच महत्वाचे असते. यामध्ये बॉलिवूड कलाकार देखील सामील आहे. यांना देखील आपले करिअर करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. कलाकार करिअर करण्यासाठी खूप कष्ट घेत असतात. इतकेच नव्हे तर त्यासाठी ते स्वतःचे नाव देखील चेंज करतात. असे काही अभिनेते व अभिनेत्री आहे ज्यांनी आपले करिअरसाठी नाव बदलले आहे. चला तर मग जाणून घेऊया या कलाकारांबद्दल….

बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांवर राज्य केले आहे. पण तुम्हाला माहित नसेल की अमिताभ बच्चन यांचे खरे नाव वेगळेच आहे. त्यांचे खरे नाव इनकलाब बच्चन आहे. त्यांनी करिअरसाठी आपले नाव बदलले आहे.

अजय देवगण- सध्या ‘तानाजी’ चित्रपटामुळे अभिनेता अजय देवगण खूपच चर्चेत आहे. त्याने देखील आपल्या करिअरसाठी नाव बददले आहे. त्याचे खरे नाव विशाल देवगण होते मात्र त्याने नाव बदलले.

रजनीकांत-मूळचा मराठी असलेला ‘शिवाजी गायकवाड’ हा आधी दाक्षिणात्य आणि पुढे हिंदी चित्रपटातही ‘रजनीकांत’झाला.

गोविंदा- 90 दशकातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक गोविंदा आहे. त्याने आजवर अनक सुपरहिट चित्रपट दिले आहे. गोविंदाचे खरे नाव अरुण आहूजा आहे. त्याने जोतिषाच्या सांगण्यावरून आपले नाव बदलले आहे.

अक्षय कुमार- बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार ज्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. त्याने चित्रपटातून चाहत्यांचे खूप मनोरंजन केले आहे. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरि ओम भाटिया होते मात्र त्याने आपले नाव बदलले.

श्रीदेवी- बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी. त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले आहे. आजही त्यांचे अस्तित्व चित्रपटामधून चाहत्यांना जाणवते. श्रीदेवी यांचे खरे नाव श्री अम्मा येंगर अय्यपन होते मात्र त्यांनी करिअरसाठी आपले नाव बदलले.

आपल्या हावभावाने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री रेखा यांचे खरे नाव ‘भानुरेखा गणेशन’ असे होते मात्र त्यांनी आपले नाव बदलून रेखा असे ठेवले.

https://www.instagram.com/p/BbVb8fwBvuU/

जॉनी लिव्हर -आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा कलाकार म्हणजे जॉनी लिव्हर. कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव जॉन राव प्रकाश राव जनुमाला होत. पण त्याने हे नाव बदलून जॉनी लिव्हर केले.

टायगर श्रॉफ – बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ. उत्तम अभिनयशैली आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर त्याने अनेकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. टायगर या नावाने लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याचं खरं नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे.

https://www.instagram.com/p/B692F4EBNJ-/

ऋतिक रोशन- ज्याने आपल्या डान्समुळे सगळ्यांना वेडे केले आहे. त्याचे खरे नाव ऋतिक नागराथ होते मात्र त्याने आपले नाव बदलले.

https://www.instagram.com/p/BpuS3gFAtmJ/

सैफ अली खानचे खरे नाव साजिद अली खान होते मात्र त्याने करिअरसाठी आपले नाव बदलले.

कतरिना कॅफ- जिच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. तिचे खरे नाव केट टर्कोट होते मात्र तिने आपले नाव बदलले.

प्रभास- दक्षिणात्या सुपरस्टार प्रभासचे चाहते केवळ भारतातच नाही तर परदेशातही असंख्य आहेय त्याने दक्षिणात्या चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. प्रभासचे खरे नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू कुलपति आहे.

https://www.instagram.com/p/B6L5RwPpxO6/

जॉन अब्राहम- जॉन अब्राहम याचे खरे नाव फरहान अब्राहम आहे. मात्र त्याने बॉलिवूडमध्ये येण्यापुर्वी आपले नाव बदलले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/