‘हाउडी मोदी’वर बॉलिवूड ‘फिदा’ ! भाईजान सलमानसह इतरांनी केलं ‘कौतुक’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात टेक्सासवासीय निर्वासित भारतीयांना संबोधित केले. यावेळी 50 हजार पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यांनी ज्याप्रकारे तेथील लोकांना संबोधित केले, त्यामुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. बॉलिवूडमधून देखील या कार्यक्रमानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यात सलमान खान, करण जोहर, अनुपम खेर, ऋषि कपूर या सेलिब्रेटींचा समावेश होता.

बॉलिवूड अभिनेता कमाल राशिद खान यांनी ट्विट केले की, हाउडी मोदी या बाबीची साक्ष आहे की आता पाकिस्तानकडे फक्त 2 मार्ग आहेत. पहिला सर्व दहशतवाद्यांना संपवा किंवा स्वत:चा देश संपवा. मला आशा आहे की इमरान खान पहिलाच पर्याय निवडतील. केआरके अशाच बेधडक ट्विटसाठी ओळखले जातात. अनेकदा ते विविध विवादास्पद वक्तव्य करतात यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका होते. परंतू अनेकदा त्यांच्या चाहत्यांकडून त्यांचे कौतूक केले जाते.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने हाउडी मोदी वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सलमानने ट्विट केले की दोन देशातील अंतर्गत सहयोग पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि ट्रम्प यांचा उत्तम मार्ग. सलामनाचे हे ट्विट व्हायरल होत आहे.

अनुपम खेर म्हणाले की, दोन देशातील नाते खरंच पाहण्यासारखे आहे. 50 हजार भारतीयांकडून देण्यात येणाऱ्या घोषणा भावनिक करणाऱ्या आणि ऐतिहासिक आहेत. पंतप्रधान मोदी तुम्ही रॉकस्टार आहात.

ऋषी कपूर यांनी देखील ट्विट केले की, तुमचा अभिमान आहे, देशाचा अभिमान आहे.

अनिल कपूर यांनी ट्विट करत म्हणले की जेव्हा आपण हातात हात घेऊन आणि खांद्याला खांदा लावून चालतो तेव्हा दोन्ही देशातील नागरिकांसाठी हा अभिमानाची दिवस आहे.

अक्षय कुमारने ट्विट केले की, जेव्हा मोदींनी देशातील स्थानिक भाषेत सर्व काही ठीक आहे हे सांगितले तेव्हा त्यांनी खरोखरच देशातील 130 कोटी भारतीयांचे प्रतिनिधत्व केले.

Visit : policenama.com