… म्हणून सलमान पासून ते तमन्ना पर्यंत ‘हे’ सर्व स्टार ‘नो किसिंग पॉलिसी’वर कायम

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – आजकाल अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री किंवा अभिनेत्याने लिपलॉक केलेले सीन पहायला मिळतात. अशा सीननंतर यांच्या चर्चा सोशल मीडियावर खूप रंगतात. मात्र बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त काळ घालवूनही ‘नो किसिंग पॉलिसी’ ला फॉलो केले आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा कलाकारांविषयी ज्यांनी या पॉलिसीला फॉलो केले आहे.

या यादीमध्ये पहिले नाव सलमान खानचे आहे. सलमान खानच्या चित्रपटांची यूएसपी ही आहे की, त्याचे चित्रपट कौटुंबिक चित्रपट असतात. सलमानला हे देखील ठाऊक आहे की त्याचे चित्रपट असे चाहते पाहतात जे मनोरंजक चित्रपट पाहू इच्छितात. यामुळेच सलमान खान इंडस्ट्रीत 30 वर्षे असूनही तो आपल्या चित्रपटात ऑनस्क्रीन किस करताना दिसला नाही.

अभिनेत्री तमन्ना भाटियाने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच या पॉलिसीचे काटेकोरपणे पालन केले आहे. तिने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की इंडस्ट्रीमध्ये बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत पण किस करण्याबाबत तिच्या पॉलिसीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तमन्नाने म्हटले आहे की, जर तिला हृतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर ती कदाचित तिच्या पॉलिसीमध्ये बदल करु शकते.

ऑनस्क्रीन किस करणार्‍या सीन्समुळे अभिनेत्री असिनही खूप अस्वस्थ राहत असते. त्यामुळेच तिने आपल्या चित्रपटात ऑनस्क्रीन किस करणे देखील टाळले आहे. ऐश्वर्या रायने 90 च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि तिने ‘धूम 2’ च्या आधी कोणत्याही चित्रपटात ऑनस्क्रीन किस केले नव्हते. हृतिक रोशनबरोबर इंडस्ट्रीमध्ये या लिपलॉकवर बरीच चर्चा झाली होती आणि त्यावेळी बच्चन कुटुंबीय ऐश्वर्यावर रागावले असल्याची बातमी आली होती. मात्र, यानंतर तिने कोणत्याही चित्रपटात ऑनस्क्रीन किस केले नाही.

हॉलिवूड स्टार रिचर्ड गेरने शिल्पा शेट्टीला लाईव्ह स्टेजवर किस केले होते, पण जेव्हा बॉलिवूड चित्रपटांची चर्चा होते तेव्हा शिल्पानेही तिच्या कारकीर्दीत नो किसिंग पॉलिसीला फॉलो केले आहे.

या यादीमध्ये शाहरुख खान आणि अजय देवगन यांची देखील नावे आहेत ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये बराच वेळ घालवला आहे, परंतु असे असूनही ते आपल्या करिअरमध्ये काम करत असताना किसिंगपासून दूर राहिले आहेत. शाहरुखने अनेक दशकांनंतर ‘हॅरी मेट सेजल’ या चित्रपटात अनुष्का शर्माबरोबर एक किसिंग सीन केला होता. त्याचबरोबर अजय देवगणनेही इंडस्ट्रीमध्ये बराच काळ घालवल्यानंतर ‘शिवाय’ या चित्रपटातील आपला नियम मोडला होता.

 

 

फेसबुक पेज लाईक करा –