लग्नापूर्वीच झाला होता ‘घोटाळा’ ! आई बनल्या होत्या ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडमध्ये लग्नाआधी आई होण्याचा ट्रेंड हा काही नवीन नसून तो खूप जूना आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधीच बाळाला जन्म दिला आहे. तर चला जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री…

श्रीदेवीः
बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका हे बिरुद अभिमानाने मिरवणा-या श्रीदेवीने 1996 मध्ये बोनी कपूरसोबत प्रेम विवाह केला. मीडिया रिपोर्टनुसार, श्रीदेवी आणि बोनी कपूर लग्नाआधी एकत्र राहत होते. याच दरम्यान श्रीदेवी गर्भवती राहिली. दोघांनी घाईघाईने लग्न केले आणि लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांची मोठी मुलगी जान्हवीचा जन्म झाला.

सारिका:
अभिनेता कमल हासनची पहिली पत्नी सारिकासुद्धा लग्नाआधी आई झाली होती. कमल आणि सारिका लिव इनमध्ये राहत होते. यावेळी सारिकाने मुलगी श्रुतीला जन्म दिला. श्रुती दोन वर्षांची झाल्यावर सारिका आणि कमल हासन विवाहबंधनात अडकले.

नताशा स्टेनकोविचः
नच बलियेची माजी स्पर्धक आणि डीजे वाले बाबू सारखी सुपरहिट गाणी देणारी नताशा ही देखील लग्नाआधीच गर्भवती राहिली होती. जानेवारी 2020 मध्ये तिने क्रिकेटर हार्दिक पांड्याशी आपला साखरपुडा झाल्याचे शेअर केले होते. त्यानंतर मे 2020 मध्ये नताशा गर्भवती असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणानंतर दोघांचे लग्न झाले. आता हार्दिक-नताशा अगस्त्या नावाच्या मुलाचे पालक आहेत.

नीना गुप्ता:
नीना वेस्ट इंडीयनचा क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्सशी डेट करत होती. याच काळात ती गर्भवती राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव मसाबा आहे.

कल्कि कोचलिनः
कल्कीही लग्नाआधीच आई बनली आहे. तिने लग्नाशिवाय आपल्या पहिल्या मुलाला सोफाला जन्म दिला आहे. कल्की या काळात गाए हर्षबर्गला डेट करीत असून त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.