home page top 1

 ‘उरी’ चित्रपटाचे बॉलिवूड कडून अनोखे प्रमोशन 

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता विकी कौशल याचा उरी हा चित्रपट आज (११जानेवारी )प्रदर्शित झाला सर्जिकल स्ट्राईक वर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. विकी कौशल च्या अभिनयाला  प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी चागलेच पसंत केले आहे. या चित्रपटाला बॉलिवूडच्या कलाकारांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहे.
चित्रपटाला शुभेच्छा देत बॉलिवूड च्या कलाकारांनी ‘जयहिंद’ घोषणा दिल्या आहे. घोषणा देत असलेला हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  या व्हिडिओत विकी कौशल सोबतआलिया भट्ट, रणवीर सिंग, रणबीर कपूर, वरूण धवन, आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, रोहित शेट्टी, एकता कपूर यांनी एकत्र येऊन घोषणा दिल्या आहेत .
२०१६साली  उरीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. याच ‘सर्जिकल स्ट्राईक’ चा थरार चित्रपटाद्वारे चित्रपटातून अनुभवता येणार आहे. या चित्रपटात विकी कौशल बरोबर परेश रावल आणि यामी गौतम महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Loading...
You might also like