सुहानानं बेस्ट फ्रेंडसोबत फोटो शेअर करत लिहिलं – Miss You ! मैत्रीण शनाया कपूर म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) ची लाडकी सुहाना खान (Suhana Khan) आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं कायमच चर्चेत येत असते. सोशलवर ती सुपरअ‍ॅक्टीव्ह असते. नुकताच तिचा एक फोटो समोर आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

सुहानानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. फोटोत ती तिच्या बेस्ट फ्रेंड सोबत पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सारा म्हणते, Miss You.

सुहानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. खास बात अशी की, तिची बेस्ट फ्रेंड शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिनंही यावर कमेंट केली आहे. शनाया म्हणते, ब्युटी.

सुहानाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रिंटेड क्रॉप टॉप आणि डेनिम घातली आहे. यात ती खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे.

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचं नाव ऑस्कर आहे.