सुहाना खाननं शेअर केला ब्लॅक टॉपमधील फोटो ! बिग बी अमिताभचा नातू म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) ची लाडकी सुहाना खान (Suhana Khan) हिनं काही दिवसांपूर्वीच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते, ज्यात ती चक्क रडताना दिसत होती. या फोटोंची खूप चर्चा झाली होती. सुहाना आपल्या फोटोंमुळं आणि व्हिडिओंमुळं नेहमीच चर्चेत येत असते. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत, जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. परंतु फोटोवरील एका कमेंटनं मात्र साऱ्याचं लक्ष वेधलं आहे.

सुहानानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक टॉप घातला आहे. डोळ्यात काजळ आणि केस मोकळे सोडलेली सुहाना खूपच सुंदर दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CHfnv6tBZs7/

सुहानाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनाही तिचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

सुहानाच्या या फोटोवर बिग बी अमिताभ (Amitabh Bachchan) बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agstya Nanda) यानं मजेदार कमेंट केली आहे ज्यानं लक्ष वेधून घेतलं आहे. अगस्त्यनं लिहिलं की, अनफॉलोविंग.

सुहानानं याला रिप्लायदेखील केला आहे. अगस्त्यला उत्तर देताना सुहानानं लिहिलं की, तू खूप फनी आणि ओरिजनल आहेस.