सनी लियोनीनं अंगुरांनी भरलेल्या ‘टब’मध्ये केली ‘धमाल’ मस्ती, लोक म्हणाले – ‘ही तर अंगुरी भाभी’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सगळ्यात प्रसिद्ध पॉर्न गर्ल सनी लिओनी शूटिंग सेटवर अतिशय मूड मूडमध्ये असते. कधीकधी ती आपल्या टीमसोबत मोकळेपणाने मस्ती करते, कधीकधी खोड्या करते. अनेकदा ती आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर अशा बर्‍याच मजेदार पोस्ट्सही शेअर करत असते. तिचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. सनी लिओनीने नुकताच असा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सनी शूटिंगच्या सेटवर दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती पाण्यात टबमध्ये बसली आहे, हा टब द्राक्षाने भरलेला आहे. या टबमध्ये सनी टॉपलेस लूकमध्ये दिसत आहे. तिने आपला हा छोटा व्हिडिओ शेअर करुन लिहले की, ‘बरेच काही क्रेजी कॅप्शन माझ्या मनात येत आहेत.’ तिचे चाहतेदेखील या पोस्टवर अनेक कॅप्शन देत आहेत. सनी लिओनीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

या व्हिडिओवर एका युजरने सनीला ‘अंगुरी भाभी’ म्हटले आहे, तर बरेच युजर तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

सनी लिओनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हंटले तर, ती सध्या ‘वीरामादेवी’ या तमिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय लवकरच ती ‘कोका कोला’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

Visit : Policenama.com