सनीच्या ‘या’ सवयीमुळे सर्व परेशान ; जाणून घ्या कोणती विचित्र सवय आहे? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या यादीतही सनी अग्रेसर आहे. त्यामुळे तिच्या व्यक्तिगत आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी तिचे फॅन्सही उत्सुक असतात. तर सनीबद्दल अशीच एक गोष्ट आम्हाला समजली आहे. तिची ही गोष्ट म्हणजे तिला एक विचित्र सवय आहे. ज्याबद्दल जास्त कोणाला माहित नाही.

काहींना आयुष्यात वारंवार हात धुवायची सवय असते. तर काहींना तोंड धुवायची सवय असते. असंच सनीला तिचे पाय वारंवार धुवायची सवय आहे. दर १५ मिनीटांनी ती आपले पाय धुवते.

सनीची ही विचित्र सवय जिस्म २ च्या शूटिंगवेळी समोर आली. तेव्हा तिच्या या सवयीमुळे शूटिंगवेळी सर्वच वैगातले होते. या सवयीमुळे ती कितीतरी वेळा शूटींगला उशीरा आली आहे.

दरम्यान, तिच्या या सवयीमुळे शुटींगवर नेहमीच परिणाम होत असतो. मात्र सनीची ही सवय काही जाता जात नाही. भले शूटिंग थांबलं तरी चालेन, पण ती पाय धुणे सोडत नाही.